मिरज-पंढरपूर महामार्गावर ३०० किलो गांजा जप्त; १ कोटी ७५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
👤 संतोष एडके तासगाव |
📅
20 August 2026 |
👁 4 Views
सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मिरज-पंढरपूर महामार्गावर मोठी कारवाई करत तब्बल ३०० किलो तयार गांजा जप्त केला. या कारवाईत गांजासह कंटेनर आणि मोबाईल असा एकूण १ कोटी ७५ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. या प्रकरणी सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील एका संशयितास अटक करण्यात आली आहे.
मंगेश प्रकाश मोरे (वय ४६, रा. बोरजाईवाडी, ता. कोरेगाव, जि. सातारा) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सांगली जिल्ह्यात अमली पदार्थांची तस्करी व विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी दिल्या होत्या.
पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मंगेश मोरे हा अशोक लेलँड कंटेनर क्रमांक NL-01-AD-9366 मधून गांजाची वाहतूक करीत आहे. त्यानुसार पथकाने मिरज-पंढरपूर महामार्गावरील तानंग फाटा ते मालगाव जाणाऱ्या रस्त्यावर सापळा रचून कंटेनर ताब्यात घेतला.
कंटेनरच्या चालकाच्या केबिनमधील कप्प्यात तपासणी केली असता, सुमारे दोन किलो वजनाची १५० खाकी रंगाची पॅकेट्स चिकटपट्टीने घट्ट गुंडाळलेल्या अवस्थेत आढळून आली. पंचांसमक्ष तपासणी केली असता या पॅकेटमध्ये हिरवट-काळपट रंगाचा फुलबोंडे असलेला तयार गांजा आढळून आला. या गांजाचे एकूण वजन सुमारे ३०० किलो असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांच्या चौकशीत संशयिताने हा गांजा ओडिशा राज्यातील बालेगोडा ते तुंबडी परिसरातील एका शेतातून आणल्याचे आणि पुणे जिल्ह्यात विक्रीसाठी घेऊन जात आहे. मात्र, हा गांजा नेमका कोणाला आणि कुठे विक्रीसाठी नेण्यात येत होता, याचा पुढील तपास सुरू आहे.
या कारवाईत १ कोटी ५० लाख रुपये किमतीचा ३०० किलो गांजा, २५ लाख रुपये किमतीचा अशोक लेलँड कंटेनर आणि १० हजार रुपये किमतीचा रेडमी कंपनीचा मोबाईल, असा एकूण १ कोटी ७५ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार
मा. पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोशी, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर
यांचे मार्गदर्शानाखाली पोलीस निरीक्षक संजीव झाडे, स्था. गु. अ. शाखा, सांगली. सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार स्था. गु. अ. शाखा, सांगली. सपोफौ / सुभाष सुर्यवंशी, पोहेकों / सागर लवटे, संदीप गुरव, अतुल माने, नागेश खरात, अनिल कोळेकर, सतीश माने, द-याप्पा बंडगर, संदीप नलावडे, अमीरशा फकीर, सागर टिंगरे, सोमनाथ गुंडे, अमर नरळे, अरुण पाटील, संकेत मगदूम,
पोकों / विक्रम खोत, बाळु सुतार, सुरज थोरात, सोमनाथ पतंगे, चापोहेकों / मोतीराम खोत, पोकों / महेश कुंभार
सायबर पोलीस ठाणे, सांगली कडील कॅप्टन गुंडवाडे, विजय पाटणकर, अजय पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली तसेच सायबर पोलीस ठाणे, सांगलीच्या पथकाने केली.हा गांजा नेमका कोणाला आणि कुठे विक्रीसाठी नेण्यात येत होता, याचा पुढील तपास सुरू आहे.प्रकरणाचा पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस करीत आहेत.