तासगावातील सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था; स्वच्छता अन् स्ट्रीट लाईटसाठी नागरिकांचा दोन दिवसांचा अल्टिमेट, अन्यथा आंदोलनाचा इशारा

👤 संतोष एडके तासगाव | 📅 19 August 2026 | 👁 4 Views
तासगावातील सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था; स्वच्छता अन् स्ट्रीट लाईटसाठी नागरिकांचा दोन दिवसांचा अल्टिमेट, अन्यथा आंदोलनाचा इशारा


तासगाव : शहरातील वरचे गल्ली व मस्के वाडा परिसरातील सार्वजनिक शौचालयांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, शौचालय परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली आहे. तसेच भिलवडी नाका येथील कै. डी. एम. (बापू) पाटील क्रीडांगण परिसरात मोठ्या प्रमाणात गवत व झाडी-झुडपे वाढल्याने परिसरात अस्वच्छता वाढली आहे. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
परिसरातील सार्वजनिक शौचालयांच्या आजूबाजूला साचलेली घाण, वाढलेले गवत व झाडी-झुडपांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. डासांचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तातडीने औषध फवारणी करून परिसर स्वच्छ करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
याबाबत नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाकडे वारंवार तोंडी सूचना व तक्रारी करूनही अद्याप परिसराची योग्य प्रकारे स्वच्छता करण्यात आलेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाच्या दुर्लक्षाबद्दल स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे, सार्वजनिक शौचालय तसेच शौचालयासमोरील परिसरात स्ट्रीट लाईटची कोणतीही व्यवस्था नसल्याने रात्रीच्या वेळी महिला, लहान मुले व वृद्ध नागरिकांना शौचालयाचा वापर करताना तसेच ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अंधाराचा फायदा घेऊन अनुचित प्रकार घडण्याची शक्यताही नागरिकांनी व्यक्त केली आहे.
त्यामुळे सदर परिसरातील अस्वच्छता तातडीने दूर करून औषध फवारणी करावी, शौचालय परिसरातील वाढलेले गवत व झाडी-झुडपे दोन दिवसांत काढून परिसर स्वच्छ करावा. तसेच नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सार्वजनिक शौचालय व शौचालयासमोरील परिसरात कायमस्वरूपी स्ट्रीट लाईटची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
“दोन दिवसांत मागणीनुसार योग्य ती कार्यवाही न झाल्यास प्रशासनाविरोधात लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
या मागणीसाठी शहर युवक काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष बाबासाहेब कदम, विवेक सूर्यवंशी, यांच्यासह स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेतला आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
राजे रामराव महाविद्यालयात शाश्वत ऊर्जा उपायांसाठी कार्यक्षम पदार्थांच्या प्रगत संश्लेषण पद्धती विषयावर आंतरराष्ट्रीय कार्यशाळा | राजे रामराव महाविद्यालयात शाश्वत ऊर्जा उपायांसाठी कार्यक्षम पदार्थांच्या प्रगत संश्लेषण पद्धती विषयावर आंतरराष्ट्रीय कार्यशाळा | तासगावातील सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था; स्वच्छता अन् स्ट्रीट लाईटसाठी नागरिकांचा दोन दिवसांचा अल्टिमेट, अन्यथा आंदोलनाचा इशारा | कुपवाडमधील केसरेकर दाम्पत्य हत्याकांडाचे तीव्र पडसाद: दि. २१ रोजी 'सांगली-कुपवाड बंद'ची हाक; निषेध मोर्चाचे आयोजन आमदार गोपीचंद पडळकर | सांगलीत शुक्रवारी ‘महावॉकेथॉन २०२६’ ‘वॉक फॉर वॉटर’मध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे : जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष | सांगोला तालुक्यातील नाझरे परिसरामधील अवैध धंद्यांमध्ये वाढ , तरुण वर्ग व्यसनाच्या आहारी ग्रामस्थांचा कारवाईचा आग्रह | कणकवलीतील जुगार कारवाईवर पालकमंत्री नितेश राणेंचा थेट इशारा; ‘ संशयित आरोपींना मदत करणारे एकही अधिकारी-कर्मचारी सुटणार नाही’ | सांगली एलसीबीची धडाकेबाज कारवाई; खूनाच्या गुन्ह्यातील आरोपी अवघ्या दोन तासांत जेरबंद | असलदे पोलीस पाटील पदाचा अतिरिक्त कार्यभार नांदगावच्या पोलीस पाटलांकडे तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांचे आदेश; | नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर तळेरे बाजारपेठेत नागमूर्त्या दाखल; चाकरमान्यांचीही गावाकडे लगबग |