नाझरे गाव सामाजिक आणि आर्थिक दृष्टीने सांगोला तालुक्यातील एक महत्त्वाचे गाव असून त्यामुळे या गावातील वातावरण शांत ठेवण्यासाठी आणि सुरक्षेच्या दृष्टीने अशा अवैध धंद्यांवर त्वरित आळा घालणे आवश्यक आहे. प्रशासनाने नियमित गस्त घालून कठोर पावले उचलावीत."
स्थानिक नागरिक, नाझरे
नाझरे ( ता - सांगोला )नाझरे गाव व लगतच्या परिसरात गेल्या काही वर्षापासून अवैध दारू विक्री, मटका आणि जुगाराचे अड्डे आहेत . या वाढत्या अवैध धंद्यांमुळे सामाजिक शांतता बाधित होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. स्थानिक रहिवाशांच्या माहितीनुसार, गावातील प्रमुख परिसर आणि काही मोकळ्या जागांवर या बेकायदेशीर हालचाली चालतात. यामुळे तरुण वर्ग व मजुरांवर विपरीत परिणाम होत असून, सायंकाळच्या वेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
या संदर्भात नागरिकांनी स्थानिक पोलिस ठाण्याकडे याबाबात गुन्हे नोंदवले जातात मात्र काही दिवसांनी तेच लोक पुन्हा आपले धंदे चालू करतात , या अवैध धंद्यांवर कायमस्वरूपी बंदी घालण्याची मागणी केली आहे. काही ग्रामस्थांच्या मते, पोलिसांकडून अपेक्षित वेगाने किंवा कठोर स्वरूपाची कारवाई झालेली नाही. त्यामुळे अवैध व्यावसायिकांचे धाडस वाढत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
दरम्यान, सांगोला पोलिस स्टेशनचे नूतन पोलिस निरीक्षक राहुल देशपांडे हे कशाप्रकारे कारवाई करणार अशी चर्चा सुरू आहे . या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासन काय भूमिका घेते आणि परिसरात अवैध धंद्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी काय ठोस उपाययोजना करते, याकडे संपूर्ण परिसरातील जनतेचे लक्ष लागले आहे.