नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर तळेरे बाजारपेठेत नागमूर्त्या दाखल; चाकरमान्यांचीही गावाकडे लगबग

👤 तुषार शिंगाडे | 📅 15 August 2026 | 👁 13 Views
नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर तळेरे बाजारपेठेत नागमूर्त्या दाखल; चाकरमान्यांचीही गावाकडे लगबग

तळेरे : श्रावण महिन्यातील पहिला महत्त्वाचा हिंदू सण असलेल्या नागपंचमीला अवघा एक दिवस शिल्लक राहिल्याने तळेरे बाजारपेठेत सणाच्या तयारीला वेग आला आहे. नागपंचमीच्या पूजनासाठी आवश्यक असलेल्या नागदेवतेच्या आकर्षक मूर्ती बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झाल्या असून, मूर्ती व पूजासाहित्य खरेदीसाठी नागरिकांची लगबग सुरू झाली आहे.
नागपंचमीच्या दिवशी घराघरांत नागदेवतेची मनोभावे पूजा करण्याची परंपरा आहे. नागांना देवस्वरूप मानून त्यांचे पूजन केले जाते. भगवान शिवाच्या गळ्यातील नाग तसेच भगवान विष्णूंचे शेषनाग यांच्याशी नागांचे धार्मिक महत्त्व जोडले गेले आहे. त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होते.
नागपंचमीचा संबंध केवळ धार्मिक श्रद्धेशी नसून शेतकरी जीवनाशीही आहे. साप उंदीर तसेच पिकांचे नुकसान करणारे विविध जीव खात असल्याने शेतीच्या दृष्टीने त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. त्यामुळे नागपूजनाच्या माध्यमातून निसर्गातील सजीवसृष्टीबद्दल आदर व कृतज्ञता व्यक्त केली जाते. निसर्गातील प्रत्येक जीवाचे महत्त्व ओळखून सहअस्तित्वाचा संदेश देणारा सण म्हणूनही नागपंचमीकडे पाहिले जाते.
दरम्यान, मुंबईसह विविध शहरांमध्ये नोकरी-व्यवसायानिमित्त वास्तव्यास असलेले चाकरमानी नागपंचमीच्या सणासाठी गावाकडे परतू लागले आहेत. गावाकडे आल्यानंतर चाकरमानीही नागदेवतेच्या मूर्ती तसेच पूजेसाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी तळेरे बाजारपेठेत गर्दी करत आहेत. त्यामुळे बाजारपेठेत सणाच्या पार्श्वभूमीवर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत वाढलेली लगबग पाहता यंदाही हा सण पारंपरिक श्रद्धा, भक्तिभाव आणि उत्साहात साजरा होणार असल्याचे चित्र आहे. नागपूजनासोबतच सर्प व निसर्गातील इतर जीवांबद्दल संवेदनशीलता जपत त्यांच्या संरक्षणाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याची गरजही या सणातून अधोरेखित होत आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
कणकवलीतील जुगार कारवाईवर पालकमंत्री नितेश राणेंचा थेट इशारा; ‘ संशयित आरोपींना मदत करणारे एकही अधिकारी-कर्मचारी सुटणार नाही’ | सांगली एलसीबीची धडाकेबाज कारवाई; खूनाच्या गुन्ह्यातील आरोपी अवघ्या दोन तासांत जेरबंद | असलदे पोलीस पाटील पदाचा अतिरिक्त कार्यभार नांदगावच्या पोलीस पाटलांकडे तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांचे आदेश; | नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर तळेरे बाजारपेठेत नागमूर्त्या दाखल; चाकरमान्यांचीही गावाकडे लगबग | तासगाव पोलिसांची दमदार कामगिरी; अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचा तीन दिवसांत छडा, गुजरातमधून आरोपी जेरबंद | स्व. प्राचार्य सुब्राव बंडगर सर स्मृती ग्रंथ 'माणहिरा' चे आज अनकटाळमध्ये प्रकाशन व अभ्यासाचे उद्घाटन | वैभववाडी बसस्थानकाच्या समस्यांवर   जि प सदस्य प्रमोद रावराणे आक्रमक विभागीय नियंत्रकांना निवेदन; १८ ऑगस्टला प्रत्यक्ष पाहणीचे आश्वासन | गुरे आडवी आल्याने डंपर पलटी; सहा प्रवासी बचावले कोल्हापूर-तळेरे मार्गावर एडगाव-रामेश्वरवाडी येथे अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली | गोंधळी समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते शिवाजी इंगळे यांचे निधन | एमपीएससीच्या ढिसाळ कारभारामुळे विद्यार्थ्यांची चिंता वाढली; अंतिम उत्तरतालिकेला दोन महिने उलटूनही जीएमएलची प्रतीक्षा |