तासगाव पोलिसांची दमदार कामगिरी; अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचा तीन दिवसांत छडा, गुजरातमधून आरोपी जेरबंद

👤 संतोष एडके तासगाव | 📅 15 August 2026 | 👁 133 Views
तासगाव पोलिसांची दमदार कामगिरी; अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचा तीन दिवसांत छडा, गुजरातमधून आरोपी जेरबंद

तासगाव : अल्पवयीन व मतिमंद मुलीला फूस लावून तिच्यावर अत्याचार करून गर्भवती केल्याप्रकरणी तासगाव पोलिसांनी दमदार कामगिरी करत अवघ्या तीन दिवसांत आरोपीचा छडा लावला. तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीला गुजरात राज्यातील फतेपुरा येथून शिताफीने ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. प्रदीप जगदीश सिंह (वय २५, रा. अमरसिंह का पुरवा, जगनपूर, जि. कानपूर देहात, उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
तासगाव शहरातील एका अल्पवयीन व मतिमंद मुलीला अनोळखी व्यक्तीने फूस लावून मोटारसायकलवरून गोटेवाडी रोडलगतच्या कॅनॉल परिसरातील पोखरणी तलावाजवळील टेकडीवरील झाडाझुडपात नेले. तेथे तिच्या आईला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याची तक्रार मुलीच्या आईने तासगाव पोलिसांत दिली होती. या अत्याचारामुळे मुलगी गर्भवती झाल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३४८/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांसह पॉक्सो कायदा २०१२ तसेच दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
पीडित मुलगी मतिमंद असल्याने आरोपीबाबत कोणतीही ठोस माहिती देणे शक्य होत नव्हते. त्यामुळे आरोपीचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मात्र, तासगाव पोलिसांनी तांत्रिक माहिती आणि कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारे आरोपीची ओळख पटवली.
तपासात प्रदीप सिंह हा वेगवेगळ्या राज्यांत फिरून बादली विक्री तसेच गॅस शेगडी विक्रीचा व्यवसाय करीत असल्याचे समोर आले. तो सध्या गुजरात राज्यातील राजस्थान सीमेलगत असलेल्या फतेपुरा येथे वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानंतर तासगाव पोलिसांच्या तपास पथकाने फतेपुरा येथे जाऊन सापळा रचला. आरोपी प्रदीप सिंह याला शिताफीने ताब्यात घेऊन तासगाव पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर त्याला तपासासाठी अटक करण्यात आली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि तासगाव विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी किरण अवचर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विशाल टकले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
तपास पथकात सहायक पोलीस निरीक्षक दीपक पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल अमर सूर्यवंशी, पोलीस शिपाई सुरज जगदाळे व निलेश डोंगरे यांचा समावेश होता. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक प्रियांका माने करीत आहेत.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
सांगली एलसीबीची धडाकेबाज कारवाई; खूनाच्या गुन्ह्यातील आरोपी अवघ्या दोन तासांत जेरबंद | असलदे पोलीस पाटील पदाचा अतिरिक्त कार्यभार नांदगावच्या पोलीस पाटलांकडे तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांचे आदेश; | नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर तळेरे बाजारपेठेत नागमूर्त्या दाखल; चाकरमान्यांचीही गावाकडे लगबग | तासगाव पोलिसांची दमदार कामगिरी; अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचा तीन दिवसांत छडा, गुजरातमधून आरोपी जेरबंद | स्व. प्राचार्य सुब्राव बंडगर सर स्मृती ग्रंथ 'माणहिरा' चे आज अनकटाळमध्ये प्रकाशन व अभ्यासाचे उद्घाटन | वैभववाडी बसस्थानकाच्या समस्यांवर   जि प सदस्य प्रमोद रावराणे आक्रमक विभागीय नियंत्रकांना निवेदन; १८ ऑगस्टला प्रत्यक्ष पाहणीचे आश्वासन | गुरे आडवी आल्याने डंपर पलटी; सहा प्रवासी बचावले कोल्हापूर-तळेरे मार्गावर एडगाव-रामेश्वरवाडी येथे अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली | गोंधळी समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते शिवाजी इंगळे यांचे निधन | एमपीएससीच्या ढिसाळ कारभारामुळे विद्यार्थ्यांची चिंता वाढली; अंतिम उत्तरतालिकेला दोन महिने उलटूनही जीएमएलची प्रतीक्षा | राजारामबापू साखर कारखाना विस्तारीकरण प्रस्तावावर ग्रामस्थांच्या हरकती |