गुरे आडवी आल्याने डंपर पलटी; सहा प्रवासी बचावले कोल्हापूर-तळेरे मार्गावर एडगाव-रामेश्वरवाडी येथे अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

👤 तुषार शिंगाडे | 📅 13 August 2026 | 👁 12 Views
गुरे आडवी आल्याने डंपर पलटी; सहा प्रवासी बचावले  कोल्हापूर-तळेरे मार्गावर एडगाव-रामेश्वरवाडी येथे अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली


वैभववाडी (प्रतिनिधी) : कोल्हापूर-तळेरे मार्गावरील एडगाव-रामेश्वरवाडी येथे गुरे अचानक रस्त्यावर आडवी आल्याने चालकाचा डंपरवरील ताबा सुटून डंपर रस्त्याच्या बाहेर जाऊन पलटी झाला. बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास हा अपघात घडला. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. मात्र, डंपरचे मोठे नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा डंपर कोल्हापूरहून तळेरेच्या दिशेने जात होता. एडगाव-रामेश्वरवाडी परिसरात अचानक गुरे रस्त्यावर आडवी आली. त्यामुळे चालकाचा डंपरवरील ताबा सुटला आणि डंपर रस्त्याच्या बाहेर जाऊन पलटी झाला.

अपघातावेळी डंपरमध्ये चालकासह तीन महिला, एक पुरुष आणि दोन लहान मुले असे प्रवासी होते. डंपर पलटी झाल्याचे समजताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. डंपरच्या केबिनमध्ये अडकलेल्या सर्व प्रवाशांना नागरिकांनी सुखरूप बाहेर काढले. सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही.

घटनेची माहिती मिळताच वैभववाडी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक उल्हास जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत अपघाताची पाहणी केली. या अपघातामुळे काही काळ मार्गावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
वैभववाडी बसस्थानकाच्या समस्यांवर   जि प सदस्य प्रमोद रावराणे आक्रमक विभागीय नियंत्रकांना निवेदन; १८ ऑगस्टला प्रत्यक्ष पाहणीचे आश्वासन | गुरे आडवी आल्याने डंपर पलटी; सहा प्रवासी बचावले कोल्हापूर-तळेरे मार्गावर एडगाव-रामेश्वरवाडी येथे अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली | गोंधळी समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते शिवाजी इंगळे यांचे निधन | एमपीएससीच्या ढिसाळ कारभारामुळे विद्यार्थ्यांची चिंता वाढली; अंतिम उत्तरतालिकेला दोन महिने उलटूनही जीएमएलची प्रतीक्षा | राजारामबापू साखर कारखाना विस्तारीकरण प्रस्तावावर ग्रामस्थांच्या हरकती | राजारामबापू साखर कारखाना विस्तारीकरण प्रस्तावावर ग्रामस्थांच्या हरकती | चिंचणी-वांगी बलात्कार प्रकरणातील आरोपीला २० वर्षे सक्तमजुरी | द्वेषाची फवारणी! दिघंचीत युवा शेतकऱ्याच्या उभ्या ढब्बू मिरचीवर तणनाशक मारले; १० लाखांचे पीक उद्ध्वस्त | सागरी कासव संरक्षणासह कोळंबी निर्यातीला चालना; ट्रॉलरवर TED बसविणे बंधनकारक | २० वर्षांच्या प्रतीक्षेनंतरचा रस्ता पहिल्याच पावसात उखडला! |