जत विधानसभा मतदारसंघातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मोठे बळ मिळाले आहे. जत एसटी आगारासाठी राज्य सरकारने 10 नवीन बसेस उपलब्ध करून दिल्या त्याबद्दल आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्याचे परिवहन मंत्री मा. नामदार श्री. प्रताप सरनाईक साहेब यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी जत एसटी आगारासाठी 10 नवीन बसेस उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार मानले आणि पुढील शुभेच्छा दिल्या.या नव्या 10 बसेसमुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना अधिक सुरक्षित आणि आरामदायी प्रवास मिळणार आहे तसेच जुन्या बसेसचा ताण कमी होऊन वेळेवर सेवा मिळणार असल्यामुळे जत तालुक्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम आणि गतिमान होणार आहे "जतच्या विकासासाठी आणि जनतेच्या हितासाठी आमचे प्रयत्न निरंतर सुरू राहतील" असा विश्वास यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला.