नागरिकांना दिलासा! आधार कार्डसाठी असे जन्म दाखले ग्राह्य धरणार

👤 राहुल टिबे ईश्वरपूर,सांगली | 📅 04 August 2026 | 👁 57 Views
नागरिकांना दिलासा! आधार कार्डसाठी  असे जन्म दाखले ग्राह्य धरणार
मुंबई :-आधार कार्ड काढताना किंवा त्यात दुरुस्ती करताना 2016 पूर्वीच्या जन्म दाखल्यांबाबत येणाऱ्या अडचणींवर आता तोडगा निघाला आहे. UIDAI मुंबई ने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई यांच्या मान्यतेनुसार दि. 28/07/2026रोजी UIDAI ने पत्र जारी केले आहे. त्यानुसार 2016 पूर्वीचे ऑफलाईन पद्धतीने दिलेले आणि जुन्या फॉर्मेटमधील जन्म दाखले आता आधारकार्डच्या माहितीसाठी ग्राह्य धरले जातील
2016 पूर्वी महाराष्ट्रात जन्म-मृत्यूची नोंदणी ऑफलाईन पद्धतीने होत होती. काही महानगरपालिका, नगरपरिषद आणि ग्रामपंचायतींनी स्वतःच्या software मधून ऑनलाईन दाखले दिले होते.2016 नंतरकेंद्र शासनाच्या CRS पोर्टल द्वारे जन्म-मृत्यू नोंदणी सुरू झाली.2016 पूर्वीचे सर्व दाखल्यांचे संगणकीकरण अजून पूर्ण झालेले नाही. त्यामुळे अनेक नागरिकांना आधारसाठी जुने दाखले ग्राह्य धरले जात नसल्याने अडचण येत होती.आता डिजिटायझेशन न झालेल्या 2016 पूर्वीच्या ऑफलाईन जन्म दाखल्यांना देखील आधार नोंदणीसाठी मान्यता देण्यात आली आहे.
या निर्णयामुळे लाखो नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेषतः वृद्ध नागरिक आणि ग्रामीण भागातील लोकांना आता आधार अपडेट/नोंदणीसाठी नवीन दाखला काढण्याची गरज भासणार नाही.


Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
कागदी रेशनकार्ड 15 ऑगस्टपासून बंद! | नागरिकांना दिलासा! आधार कार्डसाठी असे जन्म दाखले ग्राह्य धरणार | सामाईक विहिरीवरील अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू | सावळजमध्ये साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप | ग्रामीण मातीतला ओम आज ‘टीम इंडिया’चा स्टार; व्हॉलीबॉलच्या स्वप्नाला मिळाली आंतरराष्ट्रीय भरारी | झरे येथे एकदिवसीय मराठी साहित्य संमेलन उत्साहात संपन्न | तासगाव तालुक्यात समन्यायी पाणी वाटपाची गरज; "शेतकऱ्यांना न्याय्य पाणी कधी मिळणार?" – डॉ. भारत पाटणकर | 9 ऑगस्ट ला मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आष्टा नगरीत | ऊसतोड कामगाराचा मुलगा ते शिवछत्रपती पुरस्कार विजेता; शंकर गदईंचा प्रेरणादायी प्रवास विद्यार्थ्यांसमोर | आचरा गावातील बंद सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने सुरू करा; अन्यथा १५ ऑगस्टला तीव्र आंदोलनाचा इशारा |