सावळजमध्ये साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

👤 विद्याधर लोंढे | 📅 03 August 2026 | 👁 75 Views
सावळजमध्ये साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
साहित्यरत्न साहित्यसम्राट डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे तरुण मंडळ, सावळज यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यानंतर मा. कैलासजी टोकले (महालक्ष्मी फाउंडेशन) यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. तसेच समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू विद्यार्थ्यांचा संपूर्ण वार्षिक शैक्षणिक खर्च तरुण मंडळाच्या वतीने दत्तक घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करण्यात आला.

यावेळी वैद्यकीय अधिकारी, मंडळ अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी, माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी, आशा सेविका, अंगणवाडी शिक्षिका व मदतनीस यांचा डॉ. अण्णाभाऊ साठे लिखित 'फकिरा' कादंबरी भेट देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

जयंतीनिमित्त राबविण्यात आलेल्या सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, समाजाप्रती असलेली बांधिलकी आणि शिक्षणाबाबतचा सकारात्मक संदेश या उपक्रमातून अधोरेखित झाला.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य विजय धेंडे, संजय तात्या थोरात, ॲड. सुदेश बुधवले, दिलीप कांबळे, सुनील कांबळे, भूपाल कांबळे, अमित सावळजकर, अमित कांबळे, सोमनाथ कांबळे, विनोद कांबळे, राजू सावळजकर, अजय कांबळे, अमन भोरे, संतोष वाघमारे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
सामाईक विहिरीवरील अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू | सावळजमध्ये साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप | ग्रामीण मातीतला ओम आज ‘टीम इंडिया’चा स्टार; व्हॉलीबॉलच्या स्वप्नाला मिळाली आंतरराष्ट्रीय भरारी | झरे येथे एकदिवसीय मराठी साहित्य संमेलन उत्साहात संपन्न | तासगाव तालुक्यात समन्यायी पाणी वाटपाची गरज; "शेतकऱ्यांना न्याय्य पाणी कधी मिळणार?" – डॉ. भारत पाटणकर | 9 ऑगस्ट ला मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आष्टा नगरीत | ऊसतोड कामगाराचा मुलगा ते शिवछत्रपती पुरस्कार विजेता; शंकर गदईंचा प्रेरणादायी प्रवास विद्यार्थ्यांसमोर | आचरा गावातील बंद सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने सुरू करा; अन्यथा १५ ऑगस्टला तीव्र आंदोलनाचा इशारा | मालवण बंदरा येथील पोर्टा केबिनचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन | प्रशासनाने अधिक गतीने काम करत शासनाच्या सेवा नागरिकांपर्यंत पोहचवाव्यात पालकमंत्री नितेश राणे |