प्रवासी हेच आपले दैवत"हे ब्रीद अंगिकारुन संतोष भाट यांनी एसटी गाड्यांच्या दुरुस्तीचे काम अत्यंत चोख आणि जबाबदारीने पार पाडले - श्रीनिवास कदम

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 02 August 2026 | 👁 20 Views
प्रवासी हेच आपले दैवत"हे ब्रीद अंगिकारुन संतोष भाट यांनी एसटी गाड्यांच्या दुरुस्तीचे काम अत्यंत चोख आणि जबाबदारीने पार पाडले - श्रीनिवास कदम
कणकवली आगाराचे मॅकॅनिकल संतोष भाट सेवानिवृत्त; मान्यवरांकडून गौरव "एसटी महामंडळ हे केवळ माझे कार्यक्षेत्र नव्हते, तर ते माझे दुसरे कुटुंब - संतोष भाट
कणकवली डेपोचे सहाय्यक कारागिर संतोष भाट यांनी आपल्या 34 वर्षांच्या प्रदीर्घ सेवाकाळात "प्रवासी हेच आपले दैवत"हे ब्रीद अंगिकारुन एसटी गाड्यांच्या दुरुस्तीचे काम अत्यंत चोख आणि जबाबदारीने पार पाडले. प्रवाशांचा प्रवास सुरक्षित आणि विनाखंड व्हावा, यासाठी गाड्या तांत्रिकदृष्ट्या तंदुरुस्त ठेवण्यात त्यांचे योगदान नेहमीच मोलाचे राहिले आहे."असे प्रतिपादन कणकवली आगाराचे आगार व्यवस्थापक श्रीनिवास कदम यांनी केले.


कणकवली डेपोचे यांत्रिकी विभागाचे सहाय्यक कारागिर संतोष भाट हे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रदीर्घ सेवेतून
आज शुक्रवारी सेवानिवृत्त झाले.यावेळी आयोजित विशेष सत्कार व निरोप समारंभाच्या कार्यक्रमात श्रीनिवास कदम बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर कणकवली आगाराचे वाहतूक निरीक्षक प्रदीप परब, एसटी चे सेवानिवृत्त अधिकारी कृष्णा राणे, सत्कारमूर्ती संतोष भाट,सौ.स्नेहल संतोष भाट,हरकुळ बुद्रुक चे सरपंच आनंद उर्फ बंडू ठाकुर, रामचंद्र नारकर, श्रीमती वनिता गोसावी तन्वी भाट,जय भाट आदी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना
श्रीनिवास कदम म्हणाले की,विविध मान्यवरांनी संतोष भाट यांच्या कर्तव्यनिष्ठेचा आणि तांत्रिक कौशल्याचा गौरव केला आहे.हिच त्यांच्या कामाची पोचपावती आहे. आज सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला असलेली हि मोठी उपस्थिती म्हणजेच भाट यांच्या प्रेमाचा जनाधार आहे.

सेवानिवृत्ती निमित्त कणकवली आगाराच्यावतीने आगार व्यवस्थापक श्रीनिवास कदम आणि मान्यवरांच्या उपस्थितीत श्री.संतोष भाट आणि त्यांच्या पत्नी सौ.स्नेहल भाट यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह , भेटवस्तू देऊन भव्य सत्कार करण्यात आला.

यावेळी कार्यशाळेतील (वर्कशॉप) त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी संतोष भाट यांच्यासोबतच्या कामाच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि त्यांच्या मनमिळाऊ व मदतीला धावून जाणाऱ्या स्वभावाचे कौतुक केले.

यावेळी सत्काराला उत्तर देताना संतोष भाट भावनिक झाले होते. ते म्हणाले, "एसटी महामंडळ हे केवळ माझे कार्यक्षेत्र नव्हते, तर ते माझे दुसरे कुटुंब होते. वरिष्ठांचे मार्गदर्शन आणि सहकारी मेकॅनिकल बांधवांची साथ यामुळेच मी ही 34 वर्षांची प्रदीर्घ सेवा यशस्वीपणे पूर्ण करु शकलो.प्रवासी हेच दैवत हे ब्रीद घेऊन सेवा दिली.तसेच एसटी युनियन चा नेता म्हणून काम करताना माझ्या सहकाऱ्यांना न्याय दिला.हा कर्मचारी माझ्या युनियन चा नाही, दुसऱ्या युनियन चा आहे, म्हणून भेदभाव केला नाही तर तो आमच्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (एसटी) चा आहे.याला प्राधान्य दिले.

पुढे बोलताना भाट म्हणाले की ,निवृत्ती म्हणजे आयुष्याचा शेवट नाही, तर ती एका नव्या प्रवासाची सुरुवात आहे. आता मी कुटुंबाला वेळ देणार असून, माझ्या आवडी-निवडी आणि छंदांना पूर्ण करणार आहे.असेही यावेळी संतोष भाट म्हणाले.

एसटी महामंडळाच्या नवीन धोरणानुसार, सेवानिवृत्त कर्मचारी संतोष भाट आणि त्यांच्या पत्नीला वर्षभर एसटी बसेसमधून प्रवास करण्यासाठी
मोफत प्रवासाचा डिजिटल पास मान्यवरांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला

यावेळी संतोष भाट यांना सेवानिवृत्ती निमित्त शुभेच्छा देताना निरोप समारंभाला एसटी महामंडळाचे विविध विभागांतील अधिकारी, कर्मचारी, चालक-वाहक, मेकॅनिकल विभागातील सहकारी आणि भाट यांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
ऊसतोड कामगाराचा मुलगा ते शिवछत्रपती पुरस्कार विजेता; शंकर गदईंचा प्रेरणादायी प्रवास विद्यार्थ्यांसमोर | आचरा गावातील बंद सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने सुरू करा; अन्यथा १५ ऑगस्टला तीव्र आंदोलनाचा इशारा | मालवण बंदरा येथील पोर्टा केबिनचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन | प्रशासनाने अधिक गतीने काम करत शासनाच्या सेवा नागरिकांपर्यंत पोहचवाव्यात पालकमंत्री नितेश राणे | भगवान गौतम बुद्ध हेच खरे विश्वगुरू जानवलीच्या बुद्ध विहारात आषाढी पौर्णिमेचा प्रारंभ दिन कार्यक्रम | प्रवासी हेच आपले दैवत"हे ब्रीद अंगिकारुन संतोष भाट यांनी एसटी गाड्यांच्या दुरुस्तीचे काम अत्यंत चोख आणि जबाबदारीने पार पाडले - श्रीनिवास कदम | महसूल विभाग हा शासन आणि जनतेमधील विश्वासाचा मजबूत दुवा पालकमंत्री नितेश राणे | आगाऊ धान्य वितरणाच्या निर्णयाचा पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतला सखोल आढावा | पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड आवश्यक .. | अणुऊर्जा प्रकल्पाला स्थानिकांचा ठाम विरोध असताना तो मोडून काढण्यासाठी राज्य सरकार ,प्रशासन आणि पोलीस यंत्रणेचा गैरवापर करत आहेत |