बळीराजासाठी एक दिवस' उपक्रमातून विद्यार्थ्यांना शेतीचा अनोखा अनुभव मालवण तालुक्यातील तोंडवळी वरची शाळेचा उपक्रम

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 02 August 2026 | 👁 416 Views
बळीराजासाठी एक दिवस' उपक्रमातून विद्यार्थ्यांना शेतीचा अनोखा अनुभव मालवण तालुक्यातील तोंडवळी वरची शाळेचा उपक्रम
बालवयातच मुलांना शेतीची आवड निर्माण व्हावी, शेतीची विविध कामे, पिकांचे संरक्षण, आधुनिक शेतीची अवजारे, आधुनिक तंत्रज्ञान याबाबत ज्ञान व्हावे या उद्देशाने मालवण तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, तोंडवली वरची येथे 'बळीराजासाठी एक दिवस' हा उपक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमास गावच्या सरपंच स्नेहा तोंडवळकर, हडी केंद्र तथा कोळंब केंद्राचे केंद्रप्रमुख प्रशांत पारकर सर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रवीण पाटील, ग्रामपंचायत सदस्य मानसी चव्हाण वअनन्या पाटील, ग्रामस्थ बबली पाटील, शाळेच्या मुख्याध्यापिका स्मिता परब , सहशिक्षिका श्रीमती सोनल कदम व श्रीमती विभा ठाकूर, तसेच पालक, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी शेतकरी सुधीर पाटील व देवानंद पाटील यांच्या शेतीमळ्याला भेट दिली. विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या, शेतीतील विविध कामांची माहिती जाणून घेतली तसेच शेतीमध्ये प्रत्यक्ष काम करण्याचा अनोखा अनुभव घेतला. विविध शेती अवजारे, पिकांची निगा, शेतीतील आधुनिक व पारंपरिक पद्धती यांची विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून मौल्यवान ज्ञान मिळवले.

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी "गुडघा गुडघा चिखलात चिखलात" या गीतावर सादरीकरण करून उपस्थित शेतकरी बांधवांचा आनंद द्विगुणित केला. तसेच शेताच्या बांधावर सर्वांनी एकत्र बसून भोजनाचा आगळावेगळा आनंद घेतला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आदर, कष्टाचे महत्त्व आणि बळीराजाबद्दल कृतज्ञतेची भावना अधिक दृढ झाली.

शेवटी शेतकरी सुधीर पाटील व देवानंद पाटील यांचे मनःपूर्वक आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |