सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडक कारवाई; ४ किलोहून अधिक गांजा सह सराईत गुन्हेगार जेरबंद ​

👤 संतोष एडके तासगाव | 📅 02 August 2026 | 👁 969 Views
सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडक कारवाई; ४ किलोहून अधिक गांजा सह   सराईत गुन्हेगार जेरबंद ​

सांगली जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या तस्करी आणि विक्रीवर कठोर अंकुश ठेवण्यासाठी जिल्हा पोलीस दलातर्फे विशेष मोहीम राबवली जात आहे. याच मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (LCB) सांगलीच्या पथकाने धडक कारवाई करत, कवठेपिरान परिसरातुन ४ किलो १६३ ग्रॅम गांजा आणि एक कार असा एकूण ५ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एका रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारास रंगेहात जेरबंद करण्यात आले आहे.
​कारवाईचा घटनाक्रम व मुद्देमाल
​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असताना, कवठेपिरान येथील सराईत गुन्हेगार हा हुंडाई i20 कारमधून गांजा विक्रीसाठी आणणार असल्याची गोपनीय माहिती पथकातील अंमलदारांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे लक्ष्मी फाटा ते कवठेपिरान रस्त्यावरील महालक्ष्मी मंदिर परिसरात सापळा रचण्यात आला.
​संशयित कार थांबवून पंचासमक्ष झडती घेतली असता, कारच्या डिकीत पांढऱ्या पिशवीत भरलेला १ लाख ८० हजार रुपये किमतीचा ४ किलो १६३ ग्रॅम वजनाचा ओलसर गांजा मिळून आला. पोलिसांनी गांजासह ४ लाख रुपये किमतीची हुंडाई i20 चारचाकी कार असा एकूण ५,८०,०००/- रुपये मुल्याचा मुद्देमाल जप्त केला आहे.
​दाखल गुन्हा व आरोपीची माहिती
​याप्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधी द्रव आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम (NDPS Act) १९८५ चे कलम ८(क), २०(ब)ii(ब), २९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्याद पोहेकॉ/नागेश खरात यांनी दिली असून, पुढील तपास सांगली ग्रामीण पोलीस करीत आहेत.
​जेरबंद आरोपी: सचिन दादासो चव्हाण (वय ३५, रा. गांधीनगर, मराठी शाळेजवळ, कवठेपिरान, ता. मिरज, जि. सांगली)
​विशेष नोंद: सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध यापूर्वीही शरीराविरुद्धचे तसेच एनडीपीएस कायद्यान्वयचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. ही धडक कारवाई


मा. पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोशी, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर, यांचे मार्गदर्शानाखाली

पोलीस निरीक्षक संजीव झाडे, स्था. गु. अ. शाखा, प्रशांत निशाणदार, स्था. गु. अ. शाखा, सांगली पोलीस उप निरीक्षक महादेव पोवार, स्था. गु. अ. शाखा, सांगली पोहेको / अनिल कोळेकर, अतुल माने, नागेश खरात, सतिश माने, संदीप गुरव, सागर लवटे, संदीप नलावडे, मच्छिंद्र बर्डे, मोतीराम खोत, सागर टिंगरे, दरीबा बंडगर, अमर नरळे, उदय माळी, अमीर फकीर, पोकों/ विक्रम खोत, केरुबा चव्हाण, स्था. गु. अ. शाखा, सांगली. सपोफी / मेघराज रुपनर, अरुण औताडे, पोहेकों / बंडु पवार, सांगली ग्रामीण पोलीस ठाणे, पोकों / सतिश अलदर सायबर पोलीस ठाणे, सांगली. या अधिकारी व अंमलदारांनी पार पाडली आहे
​ पुढील तपास सांगली ग्रामीण पोलीस स्टेशन करीत आहे
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |