माय शिवबा प्री स्कूल मध्ये 'माझ्या आई-वडिलांचा आशीर्वाद' उपक्रम उत्साहात

👤 आकाश दडस सातारा | 📅 02 August 2026 | 👁 621 Views
माय शिवबा प्री स्कूल मध्ये 'माझ्या आई-वडिलांचा आशीर्वाद' उपक्रम उत्साहात
गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून माय शिवबा प्री-स्कूल, दहीवडी येथे "मातृदेवो भव, पितृदेवो भव" या संस्कारमूल्यांवर आधारित "माझ्या आई-वडिलांचा आशीर्वाद" हा भावस्पर्शी उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या उपक्रमात प्ले ग्रुप, नर्सरी, एल.के.जी., यू.के.जी. व फर्स्ट ग्रेडच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांचे चरण भक्तिभावाने पूजन करून त्यांचा आशीर्वाद घेतला. आई-वडील हेच जीवनातील पहिले गुरु आहेत हा संस्कार विद्यार्थ्यांच्या मनावर रुजविण्याचा उद्देश या उपक्रमामागे होता.

यावेळी विद्यार्थ्यांनी पालकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. पालकांनीही आपल्या पाल्यांना मिठाई भरवून प्रेमाने आशीर्वाद दिला. त्यामुळे संपूर्ण परिसरात आनंद, प्रेम आणि संस्कारमय वातावरण निर्माण झाले. उपस्थित पालकांनी या अभिनव उपक्रमाचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे मुलांमध्ये कुटुंबाबद्दल आदर, प्रेम व संस्कार दृढ होत असल्याची भावना व्यक्त केली.

या उपक्रमाचे आयोजन मुख्याध्यापिका प्रेरणा सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी विवेक सूर्यवंशी, मेघा करात मॅडम, काजल हिंगमिरे मॅडम, काजल फडतरे मॅडम आणि रूपाली अवघडे ताई यांनी विशेष परिश्रम घेतले.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |