शुभांगीताई गावडे यांनी शिक्षणासोबत संस्कारांची जोपासना केली; त्यांचा आदर्श प्रत्येकाने अंगीकारावा– प्रा. के. के. रानगर

👤 सतीशकुमार पडोळकर | 📅 30 July 2026 | 👁 82 Views
शुभांगीताई गावडे यांनी शिक्षणासोबत संस्कारांची जोपासना केली; त्यांचा आदर्श प्रत्येकाने अंगीकारावा– प्रा. के. के. रानगर
जत (प्रतिनिधी): दि. ३० जुलै :
राजे रामराव महाविद्यालय, जत येथील सांस्कृतिक विभाग, राष्ट्रीय सेवा योजना (NSS) आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेच्या सचिवा ज्ञानज्योती प्राचार्य सौ. शुभांगीताई गावडे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन, अभिवादन व वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाद्वारे त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि संस्कारमय कार्याला उजाळा देत त्यांच्या पवित्र स्मृतींना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ज्ञानज्योती प्राचार्य शुभांगीताई गावडे यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

     कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जत येथील सुप्रसिद्ध विधिज्ञ ॲड. राजकुमार म्हमाने उपस्थित होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, "ज्ञानज्योती प्राचार्य शुभांगीताई गावडे यांनी शिक्षण क्षेत्रात मूल्याधिष्ठित कार्य करून अनेक विद्यार्थ्यांचे जीवन घडविले. त्यांच्या स्मृती जपण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे वृक्षारोपणासारख्या विधायक उपक्रमातून समाजाला पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणे होय. वृक्षारोपण म्हणजे भावी पिढ्यांसाठी जीवनमूल्यांचा ठेवा निर्माण करण्याचे पवित्र कार्य आहे."
या कार्यक्रमास अजिंक्यतारा प्रतिष्ठानचे प्रमुख प्रभाकर भाऊ जाधव तसेच जत येथील सुप्रतिष्ठित दंतचिकित्सक व फ्रेंड्स एज्युकेशन सोसायटीचे विद्यमान चेअरमन डॉ. मदन बोर्गीकर यांची विशेष उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. के. के. रानगर होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी सांगितले, "ज्ञानज्योती प्राचार्य शुभांगीताई गावडे यांनी शिक्षणासोबत विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला आणि संस्कारक्षम शिक्षणाला नेहमीच प्राधान्य दिले. त्यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी प्रत्येकाने स्वीकारली पाहिजे. वृक्षारोपण ही केवळ औपचारिकता नसून भविष्यासाठीची मौल्यवान गुंतवणूक आहे."
        कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. के. के. रानगर होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी सांगितले, "ज्ञानज्योती प्राचार्य शुभांगीताई गावडे यांनी शिक्षणासोबत विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला आणि संस्कारक्षम शिक्षणाला नेहमीच प्राधान्य दिले. त्यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी प्रत्येकाने स्वीकारली पाहिजे. वृक्षारोपण ही केवळ औपचारिकता नसून भविष्यासाठीची मौल्यवान गुंतवणूक आहे."

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. रेश्मा लवटे यांनी केले. त्यांनी ज्ञानज्योती प्राचार्य शुभांगीताई गावडे यांच्या शैक्षणिक, सामाजिक व संस्थात्मक कार्याचा भावपूर्ण आढावा घेत त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला.
कार्यक्रमानंतर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. के. के. रानगर यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालय परिसरात विविध वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. उपस्थित मान्यवर, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धनाची सामूहिक प्रतिज्ञा घेत पर्यावरण संरक्षणाचा संकल्प व्यक्त केला.

    कार्यक्रमाचे आभार प्रा. विशाल गोडबोले यांनी मानले.
या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, गुरुदेव कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
शुभांगीताई गावडे यांनी शिक्षणासोबत संस्कारांची जोपासना केली; त्यांचा आदर्श प्रत्येकाने अंगीकारावा– प्रा. के. के. रानगर | तुळजाभवानी इंग्लिश मेडियम स्कूलचा शिष्यवृत्ती परिक्षेत दैदीप्यमान यश | ईश्वरपूर नगराध्यक्ष प्रकरणात मोठा दिलासा; आनंदराव मलगुंडेंच्या अपात्रतेच्या आदेशाला शासनाची स्थगिती | कवठेमहांकाळच्या आरोग्य सेवेला नवी दिशा; 100 बेड रुग्णालयासाठी आमदार गोपीचंद पडळकरांच्या पाठपुराव्याला पंचायत समितीची सलामी | रामगड किल्ल्यावर दुर्गवीर प्रतिष्ठान सिंधुदुर्गची श्रमदान मोहिम | पैजारवाडी येथे सद्गुरु चिले महाराजांची गुरुपौर्णिमा उत्साहात; धार्मिक कार्यक्रमांना भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद | शिरगाव माजी सरपंच हत्या प्रकरणाला नवे वळण; अनैतिक संबंध नव्हे, आर्थिक वादातून खून झाल्याची चर्चा | मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षेतील २८० गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव... | स्पर्धेत टिकण्यासाठी शासकीय नियमांची काटेकोर पालन करणे आवश्यक --राजू जठार | आषाढी एकादशी निमित्त संकलन केलेल्या कपड्यांचे सविता आश्रम पणदुर येथे केले दान |