सोलापूर विद्यापीठात १५० कंत्राटी पदांची भरती; नव्या निविदेची प्रक्रिया सुरू

👤 आशुतोष फसाले | 📅 29 July 2026 | 👁 4 Views
वर्क ऑडिट'नंतरच वाटप; १२८ कंत्राटी शिक्षकांची निवड यादी जाहीर


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात पुढील महिन्यात सुमारे १५० कंत्राटी पदांवर भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी विद्यापीठाने नव्या सेवा पुरवठादाराकडून निविदा मागवल्या असून, पुरवठादाराची निवड अंतिम झाल्यानंतर थेट भरती प्रक्रियेला सुरुवात होईल.
विद्यापीठातील परीक्षा, आस्थापना, वित्त, शिक्षक मान्यता आणि ११ शैक्षणिक संकुलांमध्ये दरवर्षी ११ महिन्यांच्या करारावर शिपाई व लिपिक या पदांसाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते. २०२५-२६ या वर्षातील सेवा पुरवठादाराची मुदत संपल्याने सध्या पूर्व नियुक्त कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले आहे. पुढील १० दिवसांत नव्या पुरवठादाराची निश्चिती झाल्यानंतर विभागनिहाय गरजेनुसार व 'वर्क ऑडिट' करूनच भरती केली जाईल.

शिपाई, लिपिक पदांसाठी पदवीधरांची रांग!
कंत्राटी पदांवर शिपाई आणि लिपिकांसाठी चांगले मानधन मिळत असल्याने पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलेले तरुणही मोठ्या संख्येने अर्ज करत आहेत. उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार गुणवत्ता यादी तयार करून पारदर्शकपणे निवड केली जाणार आहे.
१२८ कंत्राटी शिक्षकांना २५ ते ३० हजार मानधन
विद्यापीठाच्या ११ संकुलांमधील सुमारे ५ हजार विद्यार्थ्यांसाठी

१२८ कंत्राटी शिक्षकांची मुलाखतीद्वारे पहिली गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. १५ दिवसांनंतर रिक्त राहणाऱ्या जागांवर प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी देऊन दुसरी यादी प्रसिद्ध केली जाईल. या शिक्षकांना दरमहा २५ ते ३० हजार रुपये मानधन मिळणार आहे. उच्च शिक्षण विभागाकडून वाढीव पदांना मंजुरी नसल्याने या कंत्राटी शिक्षकांच्या मानधनाचा आर्थिक भार पूर्णपणे विद्यापीठालाच सहन करावा लागत आहे.

नव्या निविदेनंतरच कंत्राटी भरती
"विद्यापीठातील विविध संकुले व विभागांच्या मागणीनुसार दरवर्षी कंत्राटी पदे भरली जातात. त्यासाठी बाह्य सेवा पुरवठादाराची निविदा प्रक्रियेद्वारे निवड केली जाते. यंदाची निविदा प्रसिद्ध झाली असून, काही दिवसांत पुरवठादार अंतिम होईल. त्यानंतर कंत्राटी पदभरती सुरू केली जाईल."
अतुल लकडे, कुलसचिव, सोलापूर विद्यापीठ
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
सामाजिक बांधिलकीचा आदर्श! स्वखर्चाने शाळा परिसर स्वच्छ; वायंगणी हायस्कूलला मिळाले सुरक्षित, सुंदर रूप | पंढरीच्या वारीत 'मुक्या' जीवांची अनोखी विठ्ठल सेवा | सोलापूर विद्यापीठात १५० कंत्राटी पदांची भरती; नव्या निविदेची प्रक्रिया सुरू | सोलापूरच्या शासकीय हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू; १२ वी नंतर उज्ज्वल करिअरची सुवर्णसंधी | कारगिल विजय दिवसाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त सोलापुरात कारगिल शहीदांना सैनिकांच्या शिस्तबद्ध शैलीत मानवंदना | ठेकेदारांना अभय, नागरिकांना त्रास' | पीक विम्यात देवगडच्या शेतकऱ्यांवर अन्याय; कृषी अधिकाऱ्यांना सभागृहात धारेवर | वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा तब्बल आठ तासाने मिळाला मृतदेह..... | पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने करुळ येथील शेतकरी बेपत्ता | ओटभरणी समारंभात रुजवले संस्कारांचे बीज! |