नगराध्यक्ष यु. टी. जाधव यांनी पारावर ज्येष्ठ नागरिकांची घेतली भेट; विकासकामांवर साधला संवाद

👤 नंदकुमार विभुते आटपाडी | 📅 28 July 2026 | 👁 209 Views
नगराध्यक्ष यु. टी. जाधव यांनी पारावर ज्येष्ठ नागरिकांची घेतली भेट; विकासकामांवर साधला संवाद
आटपाडी नगरपंचायतीचे नगराध्यक्ष यु. टी. जाधव यांनी शहरातील पारावर ज्येष्ठ नागरिकांची सदिच्छा भेट घेत त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी आटपाडी तालुक्यातील युवा उद्योजक यशवंत मेटकरी हे प्रमुख उपस्थित होते.

यावेळी नगराध्यक्ष जाधव यांनी शहरात सुरू असलेल्या विविध विकासकामांची माहिती देत, नागरिकांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी नगरपंचायत कटिबद्ध असल्याचे सांगितले. शहरातील खोकेधारक व फळविक्रेत्यांसाठी करण्यात आलेली सुविधा, तसेच सुरेश इंडियन गॅस एजन्सी शेजारी साकारण्यात येत असलेल्या 'नमो गार्डन' या उद्यानाच्या कामाची माहितीही त्यांनी ज्येष्ठ नागरिकांना दिली. हे उद्यान ज्येष्ठ नागरिक, महिला, बालक आणि सर्व नागरिकांसाठी विरंगुळ्याचे केंद्र ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी शहरातील विकासकामांचे स्वागत करत काही सूचना मांडल्या. नगराध्यक्षांनी त्या सकारात्मकपणे स्वीकारून नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू राहतील, असे आश्वासन दिले.

या प्रसंगी कवडे गुरुजी, हणमंत राक्षे, मोकाशी काका, रावळ शेठ, पाटील काका, सपाटे साहेब यांच्यासह अनेक ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. उपस्थितांनी नगराध्यक्ष यु. टी. जाधव यांच्या लोकाभिमुख कार्यपद्धतीचे कौतुक करत आटपाडी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
पंढरीच्या वारीत 'मुक्या' जीवांची अनोखी विठ्ठल सेवा | सोलापूर विद्यापीठात १५० कंत्राटी पदांची भरती; नव्या निविदेची प्रक्रिया सुरू | सोलापूरच्या शासकीय हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू; १२ वी नंतर उज्ज्वल करिअरची सुवर्णसंधी | कारगिल विजय दिवसाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त सोलापुरात कारगिल शहीदांना सैनिकांच्या शिस्तबद्ध शैलीत मानवंदना | ठेकेदारांना अभय, नागरिकांना त्रास' | पीक विम्यात देवगडच्या शेतकऱ्यांवर अन्याय; कृषी अधिकाऱ्यांना सभागृहात धारेवर | वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा तब्बल आठ तासाने मिळाला मृतदेह..... | पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने करुळ येथील शेतकरी बेपत्ता | ओटभरणी समारंभात रुजवले संस्कारांचे बीज! | अनुसयामाता विश्रांतीधाम आश्रमात गुरुपौर्णिमा उत्सव |