'माणुसकीचा रेनकोट' : विश्वनायक फाउंडेशनकडून सिग्नलवरील गरजू बालक, महिला व वृद्धांना पावसाळी रेनकोटचे मोफत वाटप

👤 जतीन मोरे पनवेल | 📅 28 July 2026 | 👁 85 Views
'माणुसकीचा रेनकोट' : विश्वनायक फाउंडेशनकडून सिग्नलवरील गरजू बालक, महिला व वृद्धांना पावसाळी रेनकोटचे मोफत वाटप
समाजातील गरजू व कष्टकरी घटकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या विश्वनायक फाउंडेशन मित्रपरिवार, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने रायगड व नवी मुंबई परिसरातील विविध सिग्नलवर उदरनिर्वाहासाठी वस्तू विकणारी लहान मुले-मुली, महिला आणि वृद्ध नागरिकांना पावसाळी रेनकोटचे मोफत वाटप करण्यात आले.
पावसाळ्यात दिवसभर रस्त्यावर उभे राहून व्यवसाय करणाऱ्या या कष्टकरी बांधवांना पावसापासून संरक्षण मिळावे आणि त्यांच्या दैनंदिन रोजगारात अडथळा येऊ नये, या सामाजिक जाणिवेतून हा उपक्रम राबविण्यात आला. रेनकोट मिळाल्यानंतर लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले असून त्यांनी विश्वनायक फाउंडेशनचे मनःपूर्वक आभार मानले.
या उपक्रमात विश्वनायक फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पैलवान विजय वाक्षे, कार्यकारिणी सदस्य किरण मोटे, तसेच संस्थेचे सदस्य आप्पा वाक्षे, कु. ओंकार मोटे आणि कु. शौर्य विजय वाक्षे यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून लाभार्थ्यांना रेनकोटचे वितरण केले. यावेळी त्यांनी गरजू नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि भविष्यातही अशाच सामाजिक उपक्रमांद्वारे मदतीचा हात देण्याचा निर्धार व्यक्त केला.
या उपक्रमासाठी आदर्श फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. सुजाता सावंत यांनी विशेष सहकार्य व मोलाची साथ दिली. त्यांच्या योगदानामुळे हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडल्याबद्दल विश्वनायक फाउंडेशनच्या वतीने त्यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले.
यावेळी बोलताना संस्थापक अध्यक्ष पैलवान विजय वाक्षे यांनी सांगितले की, "समाजातील दुर्बल, कष्टकरी आणि गरजू घटकांच्या सेवेसाठी विश्वनायक फाउंडेशन भविष्यातही अशाच विविध सामाजिक उपक्रमांचे सातत्याने आयोजन करणार असून, समाजातील प्रत्येक गरजवंतापर्यंत मदतीचा हात पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न कायम राहील."
सामाजिक संवेदनशीलतेचा संदेश देणारा हा उपक्रम उपस्थित नागरिकांकडून कौतुकास पात्र ठरला.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
पंढरीच्या वारीत 'मुक्या' जीवांची अनोखी विठ्ठल सेवा | सोलापूर विद्यापीठात १५० कंत्राटी पदांची भरती; नव्या निविदेची प्रक्रिया सुरू | सोलापूरच्या शासकीय हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू; १२ वी नंतर उज्ज्वल करिअरची सुवर्णसंधी | कारगिल विजय दिवसाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त सोलापुरात कारगिल शहीदांना सैनिकांच्या शिस्तबद्ध शैलीत मानवंदना | ठेकेदारांना अभय, नागरिकांना त्रास' | पीक विम्यात देवगडच्या शेतकऱ्यांवर अन्याय; कृषी अधिकाऱ्यांना सभागृहात धारेवर | वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा तब्बल आठ तासाने मिळाला मृतदेह..... | पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने करुळ येथील शेतकरी बेपत्ता | ओटभरणी समारंभात रुजवले संस्कारांचे बीज! | अनुसयामाता विश्रांतीधाम आश्रमात गुरुपौर्णिमा उत्सव |