गुरुपौर्णिमेनिमित्त चिक्कलगी भुयार येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

👤 अनिल मदने जत | 📅 28 July 2026 | 👁 139 Views
गुरुपौर्णिमेनिमित्त चिक्कलगी भुयार येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
गुरुपौर्णिमेनिमित्त बुधवार, दि. २९ जुलै रोजी चिक्कलगी भुयार मठ येथील वैराग्यसंपन्न श्री संत बागडेबाबा मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी अभिषेक व महापूजा होणार असून, त्यानंतर सकाळी ९ ते १२ या वेळेत हरिनाम कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. दुपारी १२ वाजता चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती ह.भ.प. तुकाराम बाबा महाराज यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे.
गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित या धार्मिक सोहळ्यास श्री संत बागडेबाबांचे भाविक, ह.भ.प. तुकाराम बाबा महाराज यांचे अनुयायी तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री संत बागडेबाबा चिक्कलगी भुयार मठ व श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आले आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |