हरिनामाच्या गजरात बाल दिंडीचा सोहळा रंगला मायणी प्राथमिक शाळा मुले व मुली सहभाग

👤 स्वप्निल कांबळे,मायणी | 📅 26 July 2026 | 👁 208 Views
हरिनामाच्या गजरात बाल दिंडीचा सोहळा रंगला   मायणी प्राथमिक शाळा मुले व मुली सहभाग
प्रथमच प्राथमिक शाळा अनफळे या ठिकाणीही बाल दिंडीचे आयोजन शाळेमार्फत करण्यात आले होते यावेळी मुलांनी या बाल दिंडीत उस्फुर्त सहभाग नोंदवला शाळेतील उपक्रमशील शिक्षकांचे परिसरात कौतुक होत आहे
गेले महिनाभर आषाढी एकादशीनिमित्त संपूर्ण परिसर भक्तीमय झालेला दिसून येत आहे विठ्ठलाच्या भेटीची आस लागून राहिलेले वारकरी विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान करत आहे
याच अनुषंगाने मायणी प्राथमिक शाळा मुले व मुली यांच्या संयुक्त विद्यमानाने बाल दिंडीचे आयोजन करण्यात आले होते बाल दिंडी पूर्णपणे उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडली या बालदिंडीत संत ज्ञानेश्वर,संत तुकाराम, श्री विठ्ठल,रुक्मिणी वेशभूषा साकारन्यात आल्या होत्या या वेशभूषेने उपस्थित यांची मन जिंकली हरिनामाचा गजर,टाळ मृदंगाचा नाद,अभंग व देशभक्तीपर घोषणांनी परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला यावेळी विविध विषयावरती विद्यार्थ्यांनी जनजागृती केली
यावेळी मुख्याध्यापक सर्व शाळांचे शिक्षक शिक्षिका शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी पालक व ग्रामस्थ यांनी कार्यक्रमात उस्फूर्त सहभाग घेतला यावेळी वातावरण पूर्ण भक्तिमय होऊन गेले होते..


Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना बिस्कीट व प्रसादाचे वाटप | "आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि चंद्रभागा नदीचे भाविकांनी घेतले मनोभावे दर्शन" | सिंधू बँक स्टाफ सोसायटी ची 40 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पत्रकार भवन, सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे उत्साहात संपन्न. | टाकेवाडीत आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा उत्साहात; विठ्ठल नामाच्या जयघोषाने परिसर दुमदुमला | गोंदवलेत शाळा व दवाखाना परिसर कचरामय; ग्रामस्थांचा संताप | तोरसोळे येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण गोठ्यात घुसून मध्यरात्री केला हल्ला; वन विभागाकडून तातडीने कारवाईची मागणी | मानपाडा-वाघाडी व सोनाळे खुबरोखपाडा अंधारात; १७ दिवसांपासून वीजपुरवठा खंडित, संतप्त ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा | हरिनामाच्या गजरात बाल दिंडीचा सोहळा रंगला मायणी प्राथमिक शाळा मुले व मुली सहभाग | मायणी पक्षी आश्रयास्थानाच्या दुरवस्थेप्रकरणी वनविभागाला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे निवेदन | ज्येष्ठ नागरिक संघ इंदापूरच्या मासिक बैठकीत ५१ सदस्यांची मोफत आरोग्य तपासणी; वाढदिवसानिमित्त गुणगौरव |