आषाढी एकादशीनिमित्त टाकेवाडीत आरोग्य शिबिर; ११० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी

👤 आकाश दडस सातारा | 📅 26 July 2026 | 👁 65 Views
आषाढी एकादशीनिमित्त टाकेवाडीत आरोग्य शिबिर; ११० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी
'माझं गाव, आरोग्य संपन्न गाव' या अभियानांतर्गत मान तालुक्यातील टाकेवाडी येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने ग्रामपंचायतीच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. गावात पारंपरिक दिंडी सोहळ्याच्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या उपक्रमाला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या आरोग्य शिबिरामध्ये गावातील तब्बल ११० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. नागरिकांची रक्तदाब (बीपी), मधुमेह (शुगर) यासह प्राथमिक आरोग्य तपासणी करून आवश्यक ते आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा त्यांच्या गावातच उपलब्ध झाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले. या शिबिराचे आयोजन सरपंच निलेश दडस यांनी केले होते.

सदर शिबिराचे नियोजन आयुष्यमान आरोग्य मंदिर, आंधळी यांच्या माध्यमातून करण्यात आले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. सचिन गाडे, आरोग्य सेविका कु. गायत्री लोहार, आरोग्य सेवक राजाराम नाईकनवरे, आशा सेविका सौ. सुनिता शिंदे व सौ. छाया माने यांनी विशेष परिश्रम घेतले.

आषाढी एकादशीच्या धार्मिक वातावरणात आरोग्य जनजागृतीचा संदेश देणारा हा उपक्रम नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरला. ग्रामपंचायतीच्या या सामाजिक उपक्रमाचे ग्रामस्थांनी स्वागत करत आयोजकांचे कौतुक केले. ग्रामीण भागात अशा आरोग्य शिबिरांचे नियमित आयोजन व्हावे, अशी अपेक्षाही नागरिकांनी व्यक्त केली.

Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
आषाढी एकादशीनिमित्त टाकेवाडीत आरोग्य शिबिर; ११० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी | माण-खटाव विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदी अभ्यासू युवा नेतृत्व महेश करचे यांची निवड | विकास सोसायट्यांनी खत विक्रीचे लायसन्स तातडीने काढावीत – प्रकाश सावंत | ४ वर्षांपासून रखडलेले भटवाडी–दिर्बादेवी ११ के वी लाइन चे काम अखेर पूर्ण | राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK)चे काम राम भरोसे, या विरोधात मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे करणार उपोषण | रविवारी 'मुक्तसंवाद'मध्ये संगीत विशारद प्रसादजी शेवडे यांच्याशी सुरेल संवाद | उपरण्यावर अवतरला पंढरीचा विठुराया; देवगडच्या कलाकाराची भक्तीला रंगांची अनोखी अर्पणवेल | पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपाचा मदतीचा हात; जीवनावश्यक अन्नधान्य किटचे वाटप | आषाढी एकादशीचे अनोखे कलादर्शन; तांदळाच्या दाण्यावर अवतरले पांडुरंग;रिया कांबळीच्या अद्वितीय कलेला सलाम.. | तासगावच्या दीडशे वर्षांच्या सांस्कृतिक वारशाचा अमूल्य ठेवाही ठरतोय जीर्णोद्धाराची गरज! ​तासगावच्या गुरुवार पेठेतील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा समृद्ध इतिहास व धार्मिक परंपरा |