उपरण्यावर अवतरला पंढरीचा विठुराया; देवगडच्या कलाकाराची भक्तीला रंगांची अनोखी अर्पणवेल

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 25 July 2026 | 👁 227 Views
उपरण्यावर अवतरला पंढरीचा विठुराया; देवगडच्या कलाकाराची भक्तीला रंगांची अनोखी अर्पणवेल
आषाढी एकादशी निमित्त पारंपरिक उपरण्यावर साकारले तीन फूट उंच श्री विठ्ठलाचे हस्तचित्र; देवगड तालुक्यातील चित्रकार अक्षय मेस्त्री यांची वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती

आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने देवगड तालुक्यातील युवा चित्रकार अक्षय मेस्त्री यांनी भारतीय संस्कृती, वारकरी परंपरा आणि भक्तीभाव यांचा सुरेख संगम घडवणारी वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती साकारली आहे. पारंपरिक भारतीय संस्कृतीचे प्रतीक असलेल्या उपरण्यावर भगवान श्री विठ्ठलाचे हस्तचित्र रेखाटून त्यांनी भक्तीला कलात्मक अभिव्यक्ती दिली आहे.
सर्वसाधारणपणे कॅनव्हासवर चित्रे साकारली जात असताना, अक्षय मेस्त्री यांनी पारंपरिक उपरण्याची निवड करून आपल्या कलेतून वारकरी संप्रदायाचा सांस्कृतिक वारसा जपण्याचा प्रयत्न केला आहे. वारकरी परंपरेत उपरणे हे सन्मान, शुद्धता, सेवाभाव आणि भक्तीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे याच उपरण्यावर विठ्ठलाचे चित्र साकारत आषाढी एकादशीचा आध्यात्मिक संदेश समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.
या कलाकृतीतून "भक्ती, संस्कृती आणि कला" यांचा सुंदर मिलाफ अनुभवायला मिळतो. नव्या पिढीने आपल्या परंपरा, संस्कृती आणि वारकरी संप्रदायाशी नाते अधिक दृढ करावे तसेच भारतीय कलेचा अभिमान जपावा, हा या कलाकृतीमागील प्रमुख उद्देश असल्याचे चित्रकार अक्षय मेस्त्री यांनी सांगितले.
ऍक्रेलिक रंगांच्या माध्यमातून साकारण्यात आलेल्या या चित्राची उंची ३ फूट तर रुंदी २.५ फूट असून, त्याच्या बारकाव्यांमधून विठ्ठलभक्तीचे तेजस्वी आणि मनोभावे दर्शन घडते. आषाढी एकादशीच्या निमित्ताने देवगड तालुक्यातील या अभिनव कलाकृतीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |