तासगावच्या दीडशे वर्षांच्या सांस्कृतिक वारशाचा अमूल्य ठेवाही ठरतोय जीर्णोद्धाराची गरज! ​तासगावच्या गुरुवार पेठेतील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा समृद्ध इतिहास व धार्मिक परंपरा

👤 संतोष एडके तासगाव | 📅 25 July 2026 | 👁 308 Views
तासगावच्या दीडशे वर्षांच्या सांस्कृतिक वारशाचा अमूल्य ठेवाही ठरतोय जीर्णोद्धाराची गरज! ​तासगावच्या गुरुवार पेठेतील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा समृद्ध इतिहास व धार्मिक परंपरा

तासगाव शहरातील गुरुवार पेठेतील कुंभार बंधूंचे सुमारे १५० वर्षांची परंपरा लाभलेले श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर हे शहराच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचे एक महत्त्वाचे प्रतीक आहे. अनेक पिढ्यांपासून अखंडपणे सुरू असलेली पूजा-अर्चा, धार्मिक विधी आणि भक्तीची परंपरा आजही तेवढ्याच श्रद्धेने जपली जात असून, हे मंदिर भाविकांसाठी श्रद्धास्थानाबरोबरच तासगावच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे जिवंत प्रतीक बनले आहे.
​मंदिरात श्री विठ्ठल व माता रुक्मिणी यांच्या सुंदर, सुबक आणि आकर्षक मूर्ती विराजमान आहेत. मंदिराच्या स्थापनापासून आजपर्यंत एकही दिवस नियमित पूजा-अर्चेत खंड पडलेला नाही. कुंभार बंधूंच्या वंशपरंपरेने ही सेवा अखंडपणे सुरू ठेवली असून, हीच या मंदिराची सर्वात मोठी ओळख मानली जाते.
​वर्षभराfल धार्मिक उत्सव आणि नित्याचे आध्यात्मिक वातावरण
​वर्षभरातील प्रत्येक एकादशीला मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. आषाढी व कार्तिकी एकादशीच्या दिवशी सकाळी अभिषेक, महापूजा, महाआरती, तर सायंकाळी हरिनाम भजनाने मंदिर परिसर भक्तिमय होतो. श्रीकृष्ण जन्माष्टीमीचा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. नवरात्रोत्सात घटस्थापना करून देवीची आराधना केली जाती, तसेच दिवाळी पाडव्यापासून सलग एक महिना दररोज पहाटे काकड आरतीची परंपरा आजही अखंडपणे सुरू आहे. तसेच मंदिर परिसर भगवान महादेवाची पिंड असून, कुंभार बंधूंचे पूर्वज तुकाराम बुवा कुंभार यांची समाधीही येथे आहे.
​जीर्णोद्धारामुळे वास्तूला येणार नवे रूप
​श्रद्धा, सेवा, भक्ती आणि परंपरेचा अखंड दीप तेवत ठेवणारे गुरुवार पेठेतील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर हे तासगावच्या धार्मिक आणि सांस्कृतिक इतिहासातील एक अनमोल वैभव आहे. काळाच्या ओघात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराची वास्तू जीर्ण झाल्याने तिच्या जीर्णोद्धाराचा निर्णय घेतला आहे. मंदिराचे मूळ स्वरूप, पारंपरिक वास्तुशैली आणि ऐतिहासिक वैशिष्ट्य कायम राखत संवर्धनाचे काम करण्यात येणार आहे. प्रस्तावित जीर्णोद्धारामुळे या पवित्र वास्तूला नवे रूप प्राप्त होणार असून, तासगावच्या सांस्कृतिक वारशाच्या जतनाला नवी दिशा आणि नवी ऊर्जा मिळणार आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |