मुंगी घाटासारखा थरार! १७७ वर्षे ही दिंडी उतरतेय डोंगरातून

👤 स्वप्निल कांबळे, मायणी | 📅 24 July 2026 | 👁 174 Views
मुंगी घाटासारखा थरार! १७७ वर्षे ही दिंडी उतरतेय डोंगरातून
आषाढी एकादशीला विठुरायाच्या भेटीची आस घेऊन वारकरी तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे मार्गक्रमण करीत असतात. आषाढी एकादशी आणि दिंडी ही महाराष्ट्राची खरी ओळख आणि परंपरा दर्शविते. पंढरपूरच्या वाटेने जाणारी अशीच एक दिंडी कराड तालुक्यातील कोळे येथून प्रस्थान करते. संतश्री गाडगेनाथ महाराज यांची ही दिंडी कराड, खटाव, माण या तालुक्यातून प्रवास करून पुढे सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करते. १७७ वर्षांपासूनचा दिंडीचा मार्ग तोच आहे. खटाव तालुक्यातून माण तालुक्यात प्रवेश करताना ही दिंडी आगासवाडी च्या डोंगरावर येते. इथे संत गाडगेनाथ महाराजांच्या पादुका आहेत. त्या ठिकाणी रिंगण झाल्यानंतर सुरू होतो पालखीचा खडतर प्रवास, इथून पुढे पालखी कुलकर्णी यांच्या खोऱ्यात उतरते. हा प्रवास मुंगी घाटासारखा थरार अनुभवते. अवघड आणि चिंचोळ्या मार्गाने पाऊलवाटेने ही पालखी खाली उतरते. या पालखीचा हा प्रवास श्वास रोखून धरणारा आहे. काही वर्षांपूर्वी या मार्गासाठी प्रयत्न झाले होते ज्यामध्ये कुकुडवाड ते आगासवाडी रस्त्यासाठी रोजगार हमी योजनेतून रस्ता करण्यास सुरुवातही झाली होती. पण कालांतराने वनविभागामुळे काम थांबले. पण संत श्री गाडगेनाथ महाराजांची पालखी अविरत याच खडतर मार्गाने प्रवास करीत आहे. या पालखीचे चालक व संत गाडगेनाथ महाराजांचे थेट वंशज कृष्णत महाराज कोळेकर यांनी हा रस्ता व्हावा ही आमची प्रशासनाकडे विनंती असल्याचे सांगितले तर. भाजयुमोचे माजी जिल्हाध्यक्ष चिन्मय कुलकर्णी यांनी या रस्त्यासाठी नक्की प्रयत्न करू असे सांगितले. हा रस्ता झाला तर दक्षिणपूर्व माण तालुका आणि खटाव तालुका यांना जोडणारे अंतर जवळपास 20 किलोमीटर ने कमी होईल. सोबत माण तालुका असूनसुद्धा माण तालुक्याशी संपर्क तुटलेले आगसवाडी सुद्धा या रस्त्यामुळे कुकुडवाड आणि माण तालुक्याशी जोडले जाईल असे मत म्हस्करवाडी कुकुडवाड येथील प्रकाश शेठ सूर्यवंशी यांनी व्यक्त केले
एकंदरीत या पालखी मार्गाचे काम झाल्यास श्री संत गाडगेनाथ महाराज यांची पंढरपूर जाणारी दिंडी तर सुखकर होईलच पण परिसरातील जवळपास 16 गावाना या रस्त्याचा लाभ होईल
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |