तासगावात शेकडो विद्यार्थ्यांचा सही मोहिमेव्दारे संताप; दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील लाठीहल्ल्याचा तीव्र निषेध!

👤 संतोष एडके तासगाव | 📅 23 July 2026 | 👁 680 Views
तासगावात शेकडो विद्यार्थ्यांचा सही मोहिमेव्दारे संताप; दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील लाठीहल्ल्याचा तीव्र निषेध!


दिल्ली येथील विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या अमानुष लाठीहल्ल्याचा निषेध करण्यासाठी तासगाव येथे 'सर्व संवेदनशील पालक, विद्यार्थी आणि नागरिक' यांच्या वतीने नुकतेच एकमुखी निषेध सही अभियान राबवण्यात आले. स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व वंदन करून या अभियानाची अत्यंत उत्साहात व प्रभावीपणे सुरुवात करण्यात आली.
​महाविद्यालयातील शेकडो विद्यार्थ्यांनी या अभियानात अतिशय जोरकसपणे सहभाग नोंदवत आपल्या स्वाक्षऱ्या केल्या. "या अभियानामुळे आमच्या भावनांना योग्य वाट मोकळी करून देण्याची संधी मिळाली," अशी भावना यावेळी सहभागी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
​या मोहिमेदरम्यान रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांनीही या आंदोलनाची उत्स्फूर्त दखल घेतली. शेतकरी आंदोलन, कुस्तीगीर महिलांचे आंदोलन आणि आता निरागस विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर सरकारकडून झालेल्या अत्याचाराबद्दल नागरिकांच्या मनात प्रचंड रोष व असंतोष दिसून आला. चाललेल्या घटनेबद्दल उपस्थितांनी तीव्र शब्दांत निषेध नोंदवला.
​हे अभियान यशस्वी करण्यासाठी डॉ. बाबुराव गुरव, प्रा. वासुदेव गुरव, प्रा. राजेश रोमन, पांडुरंग जाधव, समीर कोळी, सुधीर नलवडे, अर्जुन थोरात, नूतन परिट, सुजाता म्हेत्रे मॅडम, विशाल खाडे सर, सुधाकर कोळी, बाबुराव जाधव, भरत थोरात, दत्तात्रय बामणे, सूर्यकांत शिंदे, ऋतुजा खोत आणि अमर खोत यांचे बहुमूल्य व विशेष योगदान लाभले.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |