विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ पोलिसांच्या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी उद्या २३ जुलै रोजी वंचित बहुजन आघाडी व समविचारी पक्षाच्या वतीने कवठेमंकाळ तालुका बंदची हाक

👤 विद्याधर लोंढे | 📅 22 July 2026 | 👁 458 Views
विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ पोलिसांच्या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी उद्या २३ जुलै रोजी वंचित बहुजन आघाडी व समविचारी पक्षाच्या वतीने कवठेमंकाळ तालुका बंदची हाक
दिल्ली येथे सुरू असलेल्या पेपर फुटी सारख्या गंभीर प्रश्नावर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा व अन्य मागण्यासाठी आंदोलन सुरू असताना जंतर-मंतर ते संसद अशी रॅली काढत असताना दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांच्या वर अश्रू धुर नळकांड्या फोडल्या विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्यावर क्रूरपणे लाठीमार करून त्या निष्पाप विद्यार्थी विद्यार्थिनी यांना जखमी करण्यात आले

या घटनेच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी वंचित बहुजन आघाडी व समविचारी पक्षाच्या वतीने 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंद ची हाक पुकारली आहे
त्या अनुषंगाने कवठेमंकाळ तालुका वंचित बहुजन आघाडी व समविचारी पक्षाच्या वतीने कवठेमंकाळ तालुका बंद पुकारण्यात आला आहे
कवठेमंकाळ बंद चे निवेदन कवठेमंकाळ तहसील व पोलीस स्टेशन यांना देण्यात आले आहे
तरी कवठेमंकाळ तालुक्यातील सर्व व्यापारी वर्गाने कडकडीत बंद पाळावा असे आव्हान करण्यात आले आहे व बंदमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे

यावेळी वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष दत्तात्रय बंडू आठवले कवठेमंकाळ तालुका महासचिव सुरज विजय वाघमारे अमोल तोरवे शुभम चव्हाण सौरभ कोलप सागर साबळे नागेश लोंढे वसंत साबळे जीवन साबळे प्रशांत बनसोडे यावेळी उपस्थित होते.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
आषाढी एकादशीनिमित्त टाकेवाडीत आरोग्य शिबिर; ११० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी | माण-खटाव विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदी अभ्यासू युवा नेतृत्व महेश करचे यांची निवड | विकास सोसायट्यांनी खत विक्रीचे लायसन्स तातडीने काढावीत – प्रकाश सावंत | ४ वर्षांपासून रखडलेले भटवाडी–दिर्बादेवी ११ के वी लाइन चे काम अखेर पूर्ण | राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK)चे काम राम भरोसे, या विरोधात मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे करणार उपोषण | रविवारी 'मुक्तसंवाद'मध्ये संगीत विशारद प्रसादजी शेवडे यांच्याशी सुरेल संवाद | उपरण्यावर अवतरला पंढरीचा विठुराया; देवगडच्या कलाकाराची भक्तीला रंगांची अनोखी अर्पणवेल | पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपाचा मदतीचा हात; जीवनावश्यक अन्नधान्य किटचे वाटप | आषाढी एकादशीचे अनोखे कलादर्शन; तांदळाच्या दाण्यावर अवतरले पांडुरंग;रिया कांबळीच्या अद्वितीय कलेला सलाम.. | तासगावच्या दीडशे वर्षांच्या सांस्कृतिक वारशाचा अमूल्य ठेवाही ठरतोय जीर्णोद्धाराची गरज! ​तासगावच्या गुरुवार पेठेतील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा समृद्ध इतिहास व धार्मिक परंपरा |