भाजप महिला मोर्चा, माण तालुका अध्यक्षपदी सौ. शुभांगी नाकाडे यांची नियुक्ती

👤 आकाश दडस सातारा | 📅 20 July 2026 | 👁 25 Views
भाजप महिला मोर्चा, माण तालुका अध्यक्षपदी सौ. शुभांगी नाकाडे यांची नियुक्ती
भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या संघटनात्मक बांधणीला बळकटी देण्याच्या दृष्टीने सौ. शुभांगी सागर नाकाडे (पळशी) यांची भाजप महिला मोर्चा, माण म्हसवड मंडल तालुका अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीचे पत्र भाजप महिला मोर्चाच्या सातारा जिल्हाध्यक्षा सौ. तेजस्विनी संग्राम घोरपडे यांनी प्रदान केले. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे भाऊ आणि सोनिया वहिनींनी दिलेली ही जबाबदारी त्या निष्ठेने पार पाडतील.


सौ. शुभांगी नाकाडे या गेल्या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय असून महिलांचे प्रश्न, जनजागृती, तसेच पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी सातत्याने कार्यरत आहेत. त्यांच्या नियुक्तीमुळे महिला कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.


सौ. शुभांगी नाकाडे यांनी पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल आभार मानत, पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आणि महिलांना संघटित करून जनहिताचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी पूर्ण क्षमतेने कार्य करणार असल्याची भावना व्यक्त केली.

खर तर शुभांगी नाकाडे यांना खूप मोठा राजकीय वारसा देखील आहे. त्यांचे आजोबा स्वर्गीय बाबुराव शंकरराव पाटील हे जाशी गावचे 25 वर्ष बिनविरोध सरपंच होते.सेच त्यांचे आईकडील आजोबा स्वर्गीय नामदेवराव निवृत्ती नाईक हे देखील लाखेवाडी इंदापूर या गावचे 25 वर्ष बिनविरोध सरपंच होते.त्यामुळे राजकीय गोष्टींचं बाळकडू त्यांना लहानपणात मिळालेला आहे.तसेच त्यांच्या या यशाच्या वाट्यात त्यांच्या पळशी गावातील श्री गणेश मंडळ दत्तनगर व त्यांच्या सर्व मैत्रिणी त्यांच्याशिवाय हे यश नेहमी अपूर्ण असेल या त्यांच्या भावना आहेत.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |