कृषिमंत्री भरणे मामा यांच्या शुभेच्छा; नगराध्यक्ष भरतशेठ शहा यांच्या उपस्थितीत अमरदादा नलवडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

👤 अतुल सोनकांबळे इंदापूर | 📅 20 July 2026 | 👁 291 Views
कृषिमंत्री भरणे मामा यांच्या शुभेच्छा; नगराध्यक्ष भरतशेठ शहा यांच्या उपस्थितीत अमरदादा नलवडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
इंदापूर नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २ चे लोकप्रिय नगरसेवक अमरदादा नलवडे यांचा वाढदिवस यंदा विविध सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमांना नागरिक, कार्यकर्ते व मान्यवरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी अमरदादा नलवडे यांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी इंदापूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष भरतशेठ शहा, उपनगराध्यक्ष बाळासाहेब ढवळे नगरसेवक अण्णा ढावरे तसेच इंदापूर शहरातील सर्व नगरसेवकांनी अमरदादा नलवडे यांचा सन्मान करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय (मामा) भरणे यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून अमरदादा नलवडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच शिवधर्म फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा भाजपचे युवा नेतृत्व दीपक काटे यांनीही दूरध्वनीद्वारे शुभेच्छा व्यक्त करत त्यांच्या लोकाभिमुख कार्याचा गौरव केला.

कार्यक्रमाला इंदापूरचे माजी नगरसेवक पोपट शिंदे, युवा नेते स्वप्नील राऊत, शेखर गायकवाड, यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. पत्रकार शिवाजी आप्पा पवार, अतुल सोनकांबळे, अक्षय यादव, मंथन पवार तसेच इतर पत्रकार बांधवांनीही कार्यक्रमास उपस्थिती लावली.

यावेळी बोलताना अमरदादा नलवडे यांनी जनतेच्या विश्वासाला पात्र ठरत प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक जोमाने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. "जनतेचे प्रेम, कार्यकर्त्यांचे सहकार्य आणि वरिष्ठांचे मार्गदर्शन यामुळे सामाजिक कार्याची प्रेरणा मिळते. वाढदिवस हा केवळ आनंदाचा उत्सव नसून समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी आहे," असे ते म्हणाले.

वाढदिवसानिमित्त आयोजित सामाजिक कार्यक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रभागातील नागरिक, कार्यकर्ते आणि शुभेच्छुकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अमरदादा नलवडे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी विशेष परिश्रम घेतले.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |