देशिंग ते बनेवाडी या प्रलंबित रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा, या मागणीसाठी ग्रामस्थांच्या वतीने उपजिल्हाधिकारी डॉ. कणिचे मॅडम यांना निवेदन सादर करण्यात आले.या वेळी ग्रामस्थांचे प्रतिनिधी म्हणून अरविंद डुबले व युवराज तुकाराम यमगर उपस्थित होते. त्यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन रस्त्याच्या रखडलेल्या कामामुळे नागरिक, शेतकरी, विद्यार्थी तसेच प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे सांगितले.
निवेदनात, देशिंग –बनेवाडी रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे, जेणेकरून परिसरातील नागरिकांची गैरसोय दूर होईल, अशी मागणी करण्यात आली. तसेच संबंधित विभागाने या कामाकडे गांभीर्याने लक्ष देऊन आवश्यक कार्यवाही करावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.
यावेळी प्रशासनाने निवेदनाची दखल घेत योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती उपस्थित प्रतिनिधींनी दिली.