शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांच्या जीवाला धोका, पोलीस संरक्षणाची मागणी
👤 राहुल टिबे ईश्वरपूर,सांगली |
📅
19 July 2026 |
👁 134 Views
ईश्वरपूर येथील श्री घनश्याम उर्फ जयकर दिनकर जाधव हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये सक्रिय सदस्य आहेत. तसेच ते महाराष्ट्र राज्य माहिती अधिकार कार्यकर्ता संघटनेचे देखील सक्रिय सदस्य आहेत. त्याच अनुषंगाने त्यांनी ईश्वरपूर शहरातील काही राजकीय नेत्यांच्या मालमत्ते बाबत ईश्वरपूर नगर परिषदेमध्ये माहिती अधिकार अर्ज दाखल केले होते त्यानुसार काही मंडळी यांनी बेकायदेशीर मालमत्ता उभे केल्याच्या बाबत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी अर्ज दाखल केला त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी दोघांना अपात्र ठरवले आहे. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये जाधव यांनी उरुण ईश्वरपूर नगर परिषदेमधील अजून पाच ते सहा सदस्य यांनी बेकायदेशीर बांधकाम केल्याची माहिती आपल्याकडे आहे त्यानुसार त्यांची देखील तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल करणार असल्याबाबत त्यांनी सांगितले होते. त्यामुळे एकंदरीत ज्यांना या सगळ्याचा फटका बसणार आहे अशा लोकांकडून किंवा त्याच्या समर्थका कडून आपल्या व कुटुंबीयांच्या जीवाला धोका असल्याबाबत त्यांनी सांगलीचे पोलीस अधीक्षक यांना पत्राद्वारे कळवून पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. त्यामध्ये आपल्या घराजवळ कायम पोलीस बंदोबस्त ठेवावा असे देखील म्हटले आहे. सदरच्या अर्जाच्या प्रति त्यानी महाराष्ट्र राज्याच्या राज्यपाल, गृहमंत्री तसेच ईश्वरपूर पोलीस उपाधीक्षक आणि पोलीस निरीक्षक यांना देखील पाठवले आहेत