विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला नवी उभारी; खानजोडवाडीत स्कूल बॅग व टिफिन बॉक्सचे वाटप

👤 नंदकुमार विभुते आटपाडी | 📅 19 July 2026 | 👁 235 Views
विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला नवी उभारी; खानजोडवाडीत स्कूल बॅग व टिफिन बॉक्सचे वाटप
आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न
खानजोडवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून शिक्षणाला प्रोत्साहन देणारा स्तुत्य उपक्रम रविवारी पार पडला. समाजहिताची जाणीव ठेवत संतोष शिंदे यांच्या पुढाकारातून शाळेतील विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व टिफिन बॉक्स वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाला जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिक्षण हेच उज्ज्वल भविष्यासाठीचे सर्वात प्रभावी साधन असल्याचे सांगितले. अशा सामाजिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी आत्मविश्वास आणि उत्साह वाढतो, असे मत त्यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य दादा मोठे, ज्येष्ठ नेते विष्णुपंत पाटील, लोकनियुक्त सरपंच संभाजी माने, अजित चव्हाण, विकास सोसायटीचे चेअरमन अरुण सूर्यवंशी, प्रगतशील डाळिंब बागायतदार प्रकाशभाऊ सूर्यवंशी, तसेच संतोष शिंदे यांच्यासह गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा सूर्यवंशी मॅडम, अंगणवाडीच्या नीता मॅडम, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हनुमंत मगर, ज्येष्ठ नागरिक जालिंदर सूर्यवंशी तसेच ग्रामस्थ, पालक आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला. उपस्थितांनी या सामाजिक बांधिलकीच्या कार्याचे कौतुक करत भविष्यातही असे उपक्रम सातत्याने राबविण्याची अपेक्षा व्यक्त केली.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |