जिल्हास्तरीय एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीवर वैभववाडी पंचायत समितीचे सभापती सिद्धेश रावराणे यांची निवड

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 18 July 2026 | 👁 319 Views
जिल्हास्तरीय एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीवर वैभववाडी पंचायत समितीचे सभापती सिद्धेश रावराणे यांची निवड
पंचायत समिती वैभववाडीचे सभापती सिद्धेश रावराणे यांची महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या शिफारशीनंतर शासनाने ही नियुक्ती मंजूर केली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, सिंधुदुर्ग यांनी अधिकृत पत्र जारी केले असून, शासनाच्या आदेशानुसार समितीवर रावराणे यांची सदस्य म्हणून निवड झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्यातील आरोग्यविषयक उपक्रम अधिक लोकाभिमुख, गतिमान आणि प्रभावी करण्याच्या उद्देशाने सार्वजनिक आरोग्य विभागाने जिल्हास्तरीय एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती स्थापन केली आहे. जिल्ह्यातील आरोग्य सेवा, विविध शासकीय आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी, जनजागृती, आरोग्य सुविधा बळकटीकरण तसेच लोकसहभाग वाढविण्याच्या दृष्टीने ही समिती कार्य करणार आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीवर वैभववाडी तालुक्यातून सदस्य म्हणून श्री रावराणे यांची निवड झाली आहे. याबद्दल श्री रावराणे यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे. या निवडीनंतर बोलताना श्री रावराणे म्हणाले, या
समिती सदस्य पदी निवड केल्याबद्दल पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार मानतो. या सदस्य पदाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी तसेच शासकीय आरोग्य योजनांचा लाभसर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण प्रभावीपणे काम करू, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |