सौंदळीच्या माळावर तुकोबांच्या पालखीचे निमगाव केतकीच्या वतीने जंगी स्वागत

👤 अतुल सोनकांबळे इंदापूर | 📅 18 July 2026 | 👁 188 Views
सौंदळीच्या माळावर तुकोबांच्या पालखीचे निमगाव केतकीच्या वतीने जंगी स्वागत
निमगाव केतकीत पालखी सोहळ्यादरम्यान पिण्याच्या पाण्याचे अनेक आरओ फिल्टर प्लांट बंद ठेवल्यामुळे वारकऱ्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागली. अन्नभेसळ विभागाच्या कारवाईच्या भीतीने तसेच पाणी थंड करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या केमिकल्समुळे कारवाई होण्याच्या शक्यतेमुळे प्लांट बंद ठेवण्यात आले असल्याची चर्चा दिवसभर ग्रामस्थांमध्ये होती.
'हीच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास,
पंढरीचा वारकरी, वारी चुको न दे हरी'
अशा भक्तिभावनेसह टाळ-मृदंगाच्या गजरात आणि 'ज्ञानोबा-माउली तुकाराम' च्या नामघोषात जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे शुक्रवार दि. 17 जुलै रोजी सायंकाळी 7.30 वाजता निमगाव केतकी येथील सौंदळीच्या माळावर भव्य आगमन झाले.


निमगाव केतकी ग्रामस्थांच्या वतीने पालखी रथ आणि दिंड्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सोनालीताई जाधव, पंचायत समिती सदस्य रणजीत भोंग, प्रशासक सरपंच प्रवीण डोंगरे, उपस्थित होते.

पालखी मुक्काम स्थळी पोहोचल्यानंतर गावचे प्रशासक सरपंच प्रवीण डोंगरे यांच्या हस्ते महाआरती व पूजा करण्यात आली यावेळी हजारो भाविक ग्रामस्थ उपस्थित होते.

तहसीलदार जीवन बनसोडे, गट विकास अधिकारी सचिन खुडे, इंदापूर पोलीस निरीक्षक विलास नाळे यांनी बंदोबस्ताची पाहणी केली.

या शिवाय देवराज जाधव, दशरथ डोंगरे, तुषार जाधव, संदीप भोंग, दत्तात्रय शेंडे, वसंत गाडगे, सचिन चांदणे, मच्छिंद्र चांदणे, तात्यासाहेब वडापुरे, दादाराम शेंडे, किशोर पवार, पांडुरंग हेगडे, गोरख आदलिंग यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी आणि हजारो ग्रामस्थ या स्वागत सोहळ्यात सहभागी झाले होते.

जगद्गुरूंचा पालखी मुक्काम सराफवाडी रोड पालखीतळ येथे आहे. वारकऱ्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी निमगाव केतकी ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागाने प्राथमिक आरोग्य केंद्रात वारकऱ्यांसाठी विशेष वैद्यकीय पथक तैनात, संपूर्ण गावात धूर फवारणी आणि पालखी मार्गाची स्वच्छता. 'निर्मळ वारी' अंतर्गत 1000 शौचालयांची व्यवस्था,'माझी वसुंधरा' अंतर्गत मुक्कामाच्या ठिकाणी वृक्षारोपण. गाव प्लास्टिकमुक्त ठेवण्याचा संकल्प, पाणी, वीज, कचरा कुंडी, पोलीस मदत केंद्र, अग्निशमन, रुग्णवाहिका आणि सूचना फलकांची व्यवस्था.
ध्वनीक्षेपकाद्वारे वारकऱ्यांना सूचना देण्यात येत असल्याबाबत ग्रामसेवक लक्ष्मीकांत जगताप यांनी सांगितले.


निमगाव केतकीचे चौक अक्षरशः स्वागत कमानींनी आणि मंडपांनी सजले होते. विविध पतसंस्था आणि सामाजिक संघटनांनी वारकऱ्यांसाठी सेवा सुरू केली आहे.


मुस्लिम चॅरिटेबल ट्रस्ट आणि इंदापूर तालुका मुस्लिम युवक संघटना यांच्यावतीने 'राम-रहीम एकच' हा संदेश देत शीरखुर्मा वाटप करण्यात आले. यावेळी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष मुक्तार मुलाणी, सचिन मुलाणी, पै. सिकंदर मुलाणी उपस्थित होते

यावेळी अष्टविनायक,
सिद्धिविनायक, देवराज, मयुरेश्वर, सुवर्णयुगेश्वर, केतकेश्वर, श्री गणेश, सुवर्णयुग, जनहित पतसंस्था, सोपानराव चॅरिटेबल ट्रस्ट तसेच कुंडलिक कचरे-सुनील खामगळ मित्र परिवार यांच्या वतीने हजारो वारकऱ्यांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते. ग्रामपंचायत कार्यालयाजवळ "एकही वारकरी उपाशी राहणार नाही" याची काळजी ग्रामस्थांच्या वतीने घेण्यात आली.

निमगाव केतकी हे विड्याच्या पानांसाठी प्रसिद्ध आहे. या परंपरेनुसार पान बागायतदार गोरख आदलिंग, जगन्नाथ आदलिंग, पोपठ पिसाळ, एकनाथ भिसे, सुभाष आदलिंग, विठ्ठला आदलिंग, लाला आदलिंग यांच्या वतीने वारकऱ्यांना नागवेलीच्या विड्याच्या पानांचे प्रेमाने वाटप करण्यात आले.

संपूर्ण गाव 'हरीनामाच्या' आणि सेवेच्या रंगात न्हाऊन निघाले होते.



Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न..! | महाराष्ट्राचा 'युथ आयकॉन'! पुण्याच्या रामराजे भोसले यांना राष्ट्रीय स्तरावरील मानाचा पुरस्कार | आषाढी एकादशीनिमित्त टाकेवाडीत आरोग्य शिबिर; ११० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी | माण-खटाव विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदी अभ्यासू युवा नेतृत्व महेश करचे यांची निवड | विकास सोसायट्यांनी खत विक्रीचे लायसन्स तातडीने काढावीत – प्रकाश सावंत | ४ वर्षांपासून रखडलेले भटवाडी–दिर्बादेवी ११ के वी लाइन चे काम अखेर पूर्ण | राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK)चे काम राम भरोसे, या विरोधात मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे करणार उपोषण | रविवारी 'मुक्तसंवाद'मध्ये संगीत विशारद प्रसादजी शेवडे यांच्याशी सुरेल संवाद | उपरण्यावर अवतरला पंढरीचा विठुराया; देवगडच्या कलाकाराची भक्तीला रंगांची अनोखी अर्पणवेल | पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपाचा मदतीचा हात; जीवनावश्यक अन्नधान्य किटचे वाटप |