गोखळी-तरंगवाडीत तुकोबांच्या पालखी सोहळ्यानिमित्त भव्य मोफत आरोग्य शिबिर

👤 अतुल सोनकांबळे इंदापूर | 📅 18 July 2026 | 👁 136 Views
गोखळी-तरंगवाडीत तुकोबांच्या पालखी सोहळ्यानिमित्त भव्य मोफत आरोग्य शिबिर
जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे औचित्य साधून IMA इंदापूर आणि इंदापूर मेडिकोज असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने गोखळी-तरंगवाडी येथे भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिरात पालखी सोहळ्यातील हजारो वारकरी आणि स्थानिक नागरिकांची मोफत तपासणी करून तज्ज्ञ डॉक्टरांकडून सल्ला व मोफत औषधे देण्यात आली.

यावेळी बोलताना IMA अध्यक्ष डॉ. अभिजीत ठोंबरे म्हणाले, "वारकऱ्यांच्या रूपातील विठ्ठलाची सेवा करणे हीच खरी भक्ती आहे. शरीरासोबतच मनाच्या आरोग्यासाठी भक्तीमार्ग सर्वश्रेष्ठ आहे."

शिबिरात डॉ. सागर दोशी, डॉ. अमोल रासकर, डॉ. अश्विनी ठोंबरे, डॉ. अनुजा दोशी यांच्यासह 30 हून अधिक डॉक्टरांनी सेवा दिली.
शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉ. कल्पना खाडे आणि डॉ. अतुल वणवे यांनी पुढाकार घेतला.

विष्णुपंत मकर, माऊली वाघमोडे, लक्ष्मण हरणावळ सर, प्रदीप पोळ यांच्या सहकार्याने शिबिर शिस्तबद्ध पार पडले. डॉक्टरांचा गोखळी ग्रामस्थांच्या वतीने सन्मानही करण्यात आला.

वारकऱ्यांनी डॉक्टरांच्या सेवेबद्दल समाधान व्यक्त केले.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |