पालखी सोहळा समाज जीवनातील अमूल्य ठेवा –हर्षवर्धन पाटील

👤 अतुल सोनकांबळे इंदापूर | 📅 17 July 2026 | 👁 185 Views
पालखी सोहळा समाज जीवनातील अमूल्य ठेवा –हर्षवर्धन पाटील
-पावसाची कमतरता दूर होईल -बेलवाडी येथे रिंगण सोहळ्यास उपस्थिती
जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यांची परंपरा ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, आध्यात्मिक व भक्तीची परंपरा असून, समाज जीवनातील अमूल्य ठेवा आहे. पंढरीकडे जाणारे पालखी सोहळे हे जगातील अद्वितीय असे प्रेरणादायी सोहळे आहेत, असे गौरवोद्गार राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शुक्रवारी (दि. 17) काढले.
हर्षवर्धन पाटील हे बेलवाडी (ता. इंदापूर) येथे संत तुकाराम महाराज यांच्या 341 व्या पालखी सोहळ्यातील पहिल्या गोल सोहळ्यास उपस्थित होते. प्रसंगी संवाद साधताना हर्षवर्धन पाटील बोलत होते. ते पुढे म्हणाले, महाराष्ट्राची जगभर संतांची भूमी म्हणून ओळख आहे. या पवित्र भूमीतील पालखी सोहळे ही महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा असून, संतांच्या विचारांचा प्रसार तसेच बंधुता, प्रेम आणि ऐकतेचा संदेश देण्याचे कार्य हे वारकरी संप्रदायाने अविरतपणे अनेक शतकांपासून करीत आहे.
सध्या राज्यावर पावसाच्या कमतरतेचे संकट आहे. खरिपाच्या पेरण्या सुमारे 50 टक्के एवढ्याच झालेल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात दमदार पाऊस होऊन शेती सुजलाम सुफलाम व्हावी तसेच प्रत्येकाचा संसार प्रपंच आनंदी राहावा तसेच समाजामध्ये आपुलकीची भावना कायम राहावी त्याचबरोबर वाढीस लागावी, अशी तुकोबारायांच्या चरणी प्रार्थना केल्याचे याप्रसंगी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.
या रिंगण सोहळा प्रसंगी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, पृथ्वीराज जाचक आदी मान्यवरांच्या हस्ते तुकोबारायांच्या पादुकांची आरती करण्यात आली. यावेळी या नेत्यांनी एकमेकांशी फुगडी खेळण्याचा आनंद लुटला. त्यानंतर हर्षवर्धन पाटील व मान्यवर पायी चालत पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झाले.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |