जिल्हा परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदासाठी शिवसेनेकडून महादेव हिंगमिरे यांच्या नावाची जोरदार चर्चा

👤 अनिल मदने जत | 📅 17 July 2026 | 👁 240 Views
जिल्हा परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदासाठी शिवसेनेकडून महादेव हिंगमिरे यांच्या नावाची जोरदार चर्चा
जत: सांगली जिल्हा परिषदेत स्वीकृत सदस्य पदासाठी शिवसेनेचे जत विधानसभा प्रमुख तथा उद्योजक महादेव हिंगमिरे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.जिल्हा परिषदेत शिवसेनेचे संख्याबळ आणि प्राबल्य लक्षात घेता स्वीकृत सदस्यपदी त्यांच्या निवडीची दाट शक्यता वर्तविली जात असून, राजकीय वर्तुळात या घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, महादेव हिंगमिरे हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक,राजकीय आणि विकासात्मक कामांमध्ये सक्रिय आहेत.व लिंगायत समाजाचा आक्रमक चेहरा म्हणून ओळखले जात आहे.व लिंगायत समाजाची संख्या पाहता लिंगायत समाजाला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी जत विधानसभा मतदारसंघात संघटन मजबूत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले असून, सध्या ते जत विधानसभा प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.महादेव हिंगमिरे कुटुंबाची राजकीय व सामाजिक परंपराही उल्लेखनीय मानली जाते. गत जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांची कन्या प्राची महादेव हिंगमिरे यांनी बनाळी जिल्हा परिषद निवडणूक लढविली होती.अत्यंत चुरशीच्या लढतीत त्यांचा अल्प मतांनी पराभव झाला होता.या निवडणुकी नंतरही त्यांनी मतदारसंघाशी संपर्क कायम ठेवत विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग नोंदविला आहे.महादेव हिंगमिरे यांच्या कुटुंबाची ग्राम पातळीवरील नेतृत्वाची परंपरा देखील जुनी आहे. त्यांच्या आजोबांनी सन १९५४ मध्ये वाळेखिंडी गावचे सरपंच म्हणून काम पाहिले होते. त्याच परंपरेचा वारसा पुढे नेत त्यांच्या पत्नी सौ. वसुंधा महादेव हिंगमिरे या सध्या वाळेखिंडीच्या विद्यमान सरपंच म्हणून कार्यरत असून गावाच्या विकासासाठी विविध योजना राबवत आहेत.तसेच वाळेखिडी गांवाचा राज्यात माझी वसुधरा स्पर्धेत राज्यात तिसरा क्रमांक मिळाला आहे.सांगली जिल्हा परिषदेतील स्वीकृत सदस्य पदासाठी महादेव हिंगमिरे यांच्या नावाची चर्चा रंगू लागल्याने जत तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. पक्ष नेतृत्वाकडून अंतिम निर्णय जाहीर झाल्यानंतर या चर्चेला अधिकृत स्वरूप मिळणार असले, तरी सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.
दरम्यान,स्वीकृत जिल्हा परिषद सदस्य पदाबाबतचा अंतिम निर्णय पक्ष नेतृत्व आणि संबंधित अधिकृत प्रक्रियेनंतरच स्पष्ट होणार असून, त्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |