पूर्वसूचना न देता कंत्राटी कर्मचाऱ्यांना कमी केल्याचा आरोप; शिवशक्ती वाहतूक सेनेचे जत नगरपरिषदेला निवेदन

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 16 July 2026 | 👁 180 Views
पूर्वसूचना न देता कंत्राटी कर्मचाऱ्यांना कमी केल्याचा आरोप; शिवशक्ती वाहतूक सेनेचे जत नगरपरिषदेला निवेदन
जत नगरपरिषदेत गेली अनेक वर्षे कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून कमी करण्यात आल्याचा आरोप करत शिवसेना प्रणीत शिवशक्ती वाहतूक सेनेच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांना मंगळवारी (१४ जुलै) निवेदन देण्यात आले. संबंधित कर्मचाऱ्यांना तातडीने पुन्हा सेवेत घेऊन या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.
शिवशक्ती वाहतूक सेनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संबंधित कंत्राटी कर्मचारी गेली पाच ते दहा वर्षे नगरपरिषदेच्या विविध विभागांमध्ये प्रामाणिकपणे सेवा बजावत होते. मात्र, २५ जून २०२६ पासून कोणतीही पूर्वकल्पना किंवा लेखी सूचना न देता त्यांना अचानक कामावरून कमी करण्यात आले. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले असून त्यांच्या कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी करण्यामागील कारणांची सखोल चौकशी करून न्याय द्यावा तसेच सर्व कर्मचाऱ्यांना तातडीने पुन्हा कामावर घ्यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. प्रशासनाने याबाबत सकारात्मक भूमिका घेतली नाही तर वरिष्ठ कार्यालयाकडे दाद मागण्यात येईल, असा इशाराही शिवशक्ती वाहतूक सेनेने दिला आहे.
हे निवेदन शिवशक्ती वाहतूक सेनेचे तालुका अध्यक्ष संजय वसंत व्हणमाने यांच्या नेतृत्वाखाली मुख्याधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असलेले निवेदन प्रशासनाने स्वीकारले असून, याबाबत नगरपरिषद प्रशासन कोणता निर्णय घेते, याकडे संबंधित कर्मचाऱ्यांसह तालुक्याचे लक्ष लागले आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |