सोनम वांगचुक यांना पाठींबा देण्यासाठी कणकवलीत झालेल्या उपोषणात उपनगराध्यक्ष सुशांत नाईक सहभागी

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 16 July 2026 | 👁 275 Views
सोनम वांगचुक यांना पाठींबा देण्यासाठी कणकवलीत झालेल्या उपोषणात उपनगराध्यक्ष सुशांत नाईक सहभागी
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी तातडीने राजीनामा द्यावा- सुशांत नाईक
"NEET आणि TET परीक्षांचे पेपर वारंवार लीक होत असल्याने देशातील लाखो युवकांचे भविष्य टांगणीला लागले आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी तातडीने राजीनामा दिला पाहिजे," अशी मागणी कणकवलीचे उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांनी केली आहे. दिल्लीत जंतरमंतरवर उपोषणास बसलेले सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी कणकवली येथील आप्पासाहेब पटवर्धन चौक येथे करण्यात आलेल्या एकदिवसीय उपोषणात सुशांत नाईक यांनी सहभागी होत केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.
या आंदोलनात कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर, नगरसेवक संकेत नाईक, नगरसेवक जयेश दुमाळे, वैभव मालंडकर आदी लोकप्रतिनिधी व पदाधिकारी सहभागी झाले होते.

यावेळी नगराध्यक्ष संदेश पारकर म्हणाले, "वारंवार होणाऱ्या पेपर फुटीमुळे आज देशातील तरुणायीत मोठा आक्रोश निर्माण झाला आहे. समाजात जे काही चुकीचे चालले आहे, त्याला जाहीर विरोध करण्याचे मोठे काम सोनम वांगचुक करत आहेत. त्यांच्या मागण्या समजून घेऊन जर त्याची पूर्तता केली, तरच आपण या जनतेला न्याय मिळवून देऊ शकतो. मात्र, दुर्दैवाने या संवेदनशील आंदोलनाची सरकारने अद्याप दखल घेतलेली नाही." पुढे बोलताना पारकर म्हणाले की, "आजची युवापिढी लोकशाही वाचवण्यासाठी आणि आपले हक्क मिळवण्यासाठी स्वतःहून या आंदोलनात सहभागी होत सोनम वांगचुक यांना पाठिंबा देत आहे, ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. त्यांच्या या उपोषणाला आमचाही पूर्ण पाठिंबा आहे."

उपनगराध्यक्ष सुशांत नाईक पुढे बोलताना म्हणाले, युरोप आणि चीनसारखे देश शिक्षणाचा पाया मजबूत करून पुढे जात आहेत, मात्र आपल्या देशात भ्रष्ट कारभारामुळे शिक्षण व्यवस्था खिळखिळी झाली आहे. देशाचे भविष्य वाचवण्यासाठी वांगचुक प्राणांची बाजी लावून लढत असतानाही सरकार आंदोलकांचा आवाज ऐकत नाही, हे देशाला हुकूमशाहीकडे नेणारे आहे.
संविधान टिकवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी जोपर्यंत केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मिळत नाही, तोपर्यंत सोशल मीडिया आणि प्रत्यक्ष आंदोलनाच्या माध्यमातून हा लढा तीव्र गतीने सुरूच राहील, असा इशारा यावेळी उपस्थित नेत्यांनी दिला.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |