उबाठाचे माजी खासदार विनायक राऊत यांच्या कृत्याचा जाहीर निषेध

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 16 July 2026 | 👁 181 Views
उबाठाचे माजी खासदार विनायक राऊत यांच्या कृत्याचा जाहीर निषेध
या "खरातावर" कठोर कारवाई करा उबाठाच्या बोलघेवड्या नेत्या सुषमा अंधारे आता गप्प का? पीडित गिरिजा राऊत यांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहणार वैभववाडी भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा प्राची तावडे यांचा इशारा
बुवाबाजी व जादूटोणा करून सुनेचा मानसिक व शारीरिक छळ करणाऱ्या उबाठाचे माजी खासदार विनायक राऊत यांच्या कथित कृत्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. कोकणच्या या "खरातावर" कठोर कारवाई झाली पाहिजे आणि पीडित महिला गिरिजा राऊत यांना न्याय मिळालाच पाहिजे, अशी ठाम भूमिका वैभववाडी भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा प्राची तावडे यांनी व्यक्त केली. एका महिलेवर इतके गंभीर अत्याचार होत असताना उबाठा पक्षाच्या बोलघेवड्या नेत्या सुषमा अंधारे आता गप्प का आहेत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
वैभववाडी येथील भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत प्राची तावडे यांनी विनायक राऊत यांच्यावर टीका केली. यावेळी पंचायत समितीच्या उपसभापती साची कोलते, जिल्हा परिषद सदस्या रिद्धी सुतार तसेच पंचायत समिती सदस्या सुवर्ण संसारे उपस्थित होत्या.
यावेळी प्राची तावडे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या भूमिकेवरही कडाडून टीका केली. महिलांच्या प्रश्नांवर आणि हक्कांवर नेहमी मोठमोठ्या घोषणा करणाऱ्या ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी आता कुठे लपून बसल्या आहेत? गिरिजा राऊत प्रकरणात त्या मुग गिळून गप्प का आहेत? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
हा लढा अधिक तीव्र करण्यासाठी विविध स्तरांवर आवाज उठविण्यात येईल आणि संबंधित महिलेला न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच ठेवला जाईल, असा इशारा भाजप महिला मोर्चाच्या वतीने देण्यात आला.
तसेच पीडित गिरिजा राऊत यांना न्याय मिळवून देण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा केला जाईल, अशी ठाम भूमिकाही महिला पदाधिकाऱ्यांनी यावेळी मांडली.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
हरिनामाच्या गजरात बाल दिंडीचा सोहळा रंगला मायणी प्राथमिक शाळा मुले व मुली सहभाग | मायणी पक्षी आश्रयास्थानाच्या दुरवस्थेप्रकरणी वनविभागाला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे निवेदन | ज्येष्ठ नागरिक संघ इंदापूरच्या मासिक बैठकीत ५१ सदस्यांची मोफत आरोग्य तपासणी; वाढदिवसानिमित्त गुणगौरव | राष्ट्रीय कर्तव्यात मुढेवाडीचा डंका! अहोरात्र कष्टातून 'SIR' चे काम आटपाडी तालुक्यात प्रथम पूर्ण | देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न..! | महाराष्ट्राचा 'युथ आयकॉन'! पुण्याच्या रामराजे भोसले यांना राष्ट्रीय स्तरावरील मानाचा पुरस्कार | आषाढी एकादशीनिमित्त टाकेवाडीत आरोग्य शिबिर; ११० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी | माण-खटाव विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदी अभ्यासू युवा नेतृत्व महेश करचे यांची निवड | विकास सोसायट्यांनी खत विक्रीचे लायसन्स तातडीने काढावीत – प्रकाश सावंत | ४ वर्षांपासून रखडलेले भटवाडी–दिर्बादेवी ११ के वी लाइन चे काम अखेर पूर्ण |