प्रेरणादायी प्रोत्साहनातून उच्चपदस्थ अधिकारी घडतील

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 16 July 2026 | 👁 270 Views
प्रेरणादायी प्रोत्साहनातून उच्चपदस्थ अधिकारी घडतील
विजयकुमार कदमः शिक्षक भारतीच्या संघटनच्यावतीने देवगड तालुक्यातील शिष्यवृत्ती धारकांचा सत्कार सोहळा
देवगड : शिष्यावृतीधारक विद्यार्थ्यांच्या पाठीवर शिक्षक भारतीने सामाजिक बांधिलकीतून मारलेली कौतूकाची थाप प्रेरणादायी आहे. शिष्यावृत्ती परिक्षा ही स्पर्धा परिक्षांची पहिली पायरी आहे मिळालेल्या प्रोत्साहनातूनच
आगामी काळात आएएस आयपीएस दर्जाचे उच्च पदस्थ अधिकारी घडतील असे प्रतिपादन शिरगांव हायस्कूल शाळा समितीचे अध्यक्ष विजयकुमार कदम यांनी शिरगांव येथे केले
शिक्षक भारती संघटनेच्यावतीने देवगड तालुक्यातील शिष्यावृत्तीधारक विद्यार्थी पालक मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार सोहळा शिरगांव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सभागृहात विजयकुमार कदम यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी पार पडला यावेळी मार्गदर्शन करताना कदम म्हणाले ज्यांची कार्य विचार आणि कृती करण्याची पद्धती इतरांपेक्षा वेगळी असतात तेच विजेते ठरतात. कौतुकाची प्रेरणा घेऊन आपली बुद्धिमत्ता, विचारशक्ती आणि कृती जर अधिक वाहती ठेवली, प्रेरित ठेवली, तर आणखीन दैदिप्यमान यश संपादन करता येईल असे मार्गदर्शन केले
कार्यक्रमचे प्रमुख पाहूणे शिक्षक भारतीचे राज्य प्रमुख कार्यवाह संजय वेतुरेकर म्हणाले, जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे आयुष्यात मोठे होताना समाजाबद्दल कणव, संवेदनशिलता नसेल तर त्या मोठपणाचा आणि शिक्षणाचा काहिही उपयोग नाही. सुख, समाधान, आनंद हे सामाजिक बांधिलकी आणि ऋणानुबंधावर अवलंबून असतात. जेव्हा आपण दुसऱ्याचा विचार करतो, तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने मोठे होतो असे मार्गदर्शन केले.
यावेळी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी, पालक, मार्गदर्शक शिक्षक यांचा भेटवस्तू गौरवचिन्ह सन्मानपत्र देऊन उपस्थित मान्यवर व पदाधिकारी यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला
कार्यक्रमास शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत आडेलकर, सचिव समीर परब, कार्याध्यक्ष प्रदीप सावंत, उपाध्यक्ष सिद्धार्थ तांबे, देवगड तालुकाध्यक्ष हेमंत सावंत, शिरगांव हायस्कूल शाळा समिती सदस्य दिनेश साटम, शिरगांव केद्रप्रमुख बापू खरात आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळू पाटील यांनी केले. सूत्रसंचालन रुपेश बांदेकर यांनी केले तर आभार सागर फाळके यांनी मानले.
फोटो
शिक्षक भारती संघटनेच्यावतीने देवगड तालुक्यातील शिष्यावृत्तीधारक विद्यार्थी पालक मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार सोहळा शिरगांव येथे पार पडला.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |