देवगड हायस्कूलमध्ये विद्यार्थी स्वराज्य सभा निवडणुक उत्साहात

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 16 July 2026 | 👁 161 Views
देवगड हायस्कूलमध्ये विद्यार्थी स्वराज्य सभा निवडणुक उत्साहात
देवगड प्रतिनिधी : शेठ म. ग. हायस्कूल, देवगड येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी विद्यार्थी स्वराज्य सभा निवडणुक उत्साहात पार पडली. शाळेमध्ये विद्यार्थी लोकशाही मूल्यांची जोपासना व्हावी, नेतृत्वगुण विकसित व्हावेत आणि विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रियेची प्रत्यक्ष माहिती मिळावी या उद्देशाने या निवडणुकीचे आयोजन करण्यात आले होते.
या निवडणुकीत विद्यार्थिनी प्रतिनिधी, वर्ग प्रतिनिधी तसेच शालेय मंत्रिमंडळातील विविध पदांसाठी मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाच्या धर्तीवर मतदार यादी, उमेदवारी अर्ज, प्रचार, मतदान आणि मतमोजणी ईव्हीएम मशीन ॲपव्दारे अशा सर्व प्रक्रिया राबविण्यात आल्या.
सार्वत्रिक निवडणुकांमध्ये ज्याप्रमाणे मतदान प्रक्रिया चालते त्याचप्रमाणे सर्व व्यवस्था करण्यात आलेली होती. यामध्ये केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, उमेदवारांचे प्रतिनिधी, उमेदवार, बोटाला शाई लावणे, उमेदवारांचे अनुमोदक या सर्व भूमिका विद्यार्थ्यांनी पार पाडल्या. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष मतदान कक्षामध्ये जाऊन ईव्हीएम ॲपद्वारे आपले मत दिले. सर्व मतदारांना चिठ्ठ्या देखील देण्यात आलेल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साहाचे वातावरण होते.
हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक श्री प्रविण खडपकर, पर्यवेक्षिका सौ. निशा दहिबावकर आणि निवडणूक विभाग समिती मधील श्री राजेंद्र कोयंडे, श्री सुरेश पवार, सो आफरीन पठाण, श्री. प्रसाद शेवडे आणि श्री उमेश कोयंडे याने विशेष मेहनत घेऊन हा नाविन्यपूर्ण उपक्रम यशस्वी करून विद्यार्थ्यांना मतदान प्रक्रियेची प्रत्यक्ष अनुभूती दिली. शाळेने राबविलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांना लोकशाही मूल्ये, जबाबदारीची जाणीव आणि नेतृत्वगुण विकसित करण्याची संधी मिळणार असल्याचे शाळा प्रशासनाने सांगितले.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |