जन्म मृत्यु दाखल्यांसाठी नागरिक बेहाल, अधिकारी हतबल

👤 राहुल टिबे ईश्वरपूर,सांगली | 📅 13 July 2026 | 👁 155 Views
जन्म मृत्यु दाखल्यांसाठी नागरिक बेहाल, अधिकारी हतबल
राज्यभरातील नगरपालिका, नगरपरिषद आणि ग्रामपंचायतींमध्ये गेल्या काही महिन्यांपासून जन्म आणि मृत्यूचे दाखले मिळवण्यासाठी नागरिकांना प्रचंड हेलपाटे मारावे लागत आहेत. एसआयआर अर्थात विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेमुळे संपूर्ण प्रक्रिया रखडल्याने नागरिक बेहाल झाले आहेत, तर अधिकारीही हतबल झाले आहेत.
मतदार याद्यांच्या मॅपिंगसाठी जन्म दाखल्याला मोठे महत्त्व आले आहे. नागरिकाचा रहिवास निश्चित करण्यासाठी याच आधार घेतला जात आहे. त्यामुळे काही ठिकाणी पूर्वी झालेल्या चुकीच्या नोंदी शोधून रद्द करण्याची मोहीम सुरू आहे.
संपूर्ण देशासाठी केंद्र सरकारची CRS ही एकच संगणक प्रणाली आहे. त्यामध्येच जन्म-मृत्यूची नोंद करणे बंधनकारक आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांनी नोंद भरल्यानंतर ती जिल्हा पातळीवरून शहानिशा करून मान्य करावी लागते. एका जिल्ह्यातील सर्व नगरपालिका, नगरपंचायत आणि ग्रामपंचायतींचे हजारो अर्ज एकाच टेबलवर येत असल्याने कामाचा प्रचंड लोड झाला आहे.
प्रत्येक नगरपालिका आणि ग्रामपंचायतीमध्ये सध्या फक्त एकच लॉगिन सुरू आहे. त्यामुळे कामाचा वेग अत्यंत मंदावला आहे.
शाळा प्रवेश, आधार कार्ड, पासपोर्ट, मतदार नोंदणी यांसारख्या कामांसाठी दाखला तातडीने हवा असतो. मात्र अर्ज करूनही आठवडे निघून जात आहेत. यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे.
प्रक्रिया पारदर्शक व्हावी आणि चुकीच्या नोंदी होऊ नयेत यासाठीच ही कडक तपासणी सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी घाई-गडबड न करता शासनाला सहकार्य करावे, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
हरिनामाच्या गजरात बाल दिंडीचा सोहळा रंगला मायणी प्राथमिक शाळा मुले व मुली सहभाग | मायणी पक्षी आश्रयास्थानाच्या दुरवस्थेप्रकरणी वनविभागाला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे निवेदन | ज्येष्ठ नागरिक संघ इंदापूरच्या मासिक बैठकीत ५१ सदस्यांची मोफत आरोग्य तपासणी; वाढदिवसानिमित्त गुणगौरव | राष्ट्रीय कर्तव्यात मुढेवाडीचा डंका! अहोरात्र कष्टातून 'SIR' चे काम आटपाडी तालुक्यात प्रथम पूर्ण | देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न..! | महाराष्ट्राचा 'युथ आयकॉन'! पुण्याच्या रामराजे भोसले यांना राष्ट्रीय स्तरावरील मानाचा पुरस्कार | आषाढी एकादशीनिमित्त टाकेवाडीत आरोग्य शिबिर; ११० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी | माण-खटाव विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदी अभ्यासू युवा नेतृत्व महेश करचे यांची निवड | विकास सोसायट्यांनी खत विक्रीचे लायसन्स तातडीने काढावीत – प्रकाश सावंत | ४ वर्षांपासून रखडलेले भटवाडी–दिर्बादेवी ११ के वी लाइन चे काम अखेर पूर्ण |