जीवन प्रबोधिनी ट्रस्टचे शैक्षणिक उपक्रम विद्यार्थ्यांच्या प्रगतीला हातभार लावणारे - प्रकाश दळवी

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 11 July 2026 | 👁 233 Views
जीवन प्रबोधिनी  ट्रस्टचे शैक्षणिक उपक्रम विद्यार्थ्यांच्या  प्रगतीला हातभार लावणारे - प्रकाश दळवी
जीवन प्रबोधिनी ट्रस्टतर्फे कळसुलीतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप




कणकवली दि.८ जुलै (प्रतिनिधी) कणकवली तालुक्यातील कळसुली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक १ तसेच श्री देव भोगनाथ विद्यामंदिर जिल्हा परिषद आदर्श शाळा क्रमांक ३ मधील विद्यार्थ्यांना जीवन प्रबोधिनी ट्रस्टच्या वतीने संस्थापक अध्यक्ष सत्यवान अ. नर यांच्या पुढाकारातून शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला हातभार लावणारा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे मान्यवरांनी यावेळी सांगितले.

यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण संघाचे माजी अध्यक्ष प्रकाश दळवी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, "मराठी माध्यमातील शाळांमधून शिक्षण घेऊन अनेक विद्यार्थी आज विविध उच्च पदांवर कार्यरत आहेत. त्यामुळे मराठी शाळांविषयी न्यूनगंड बाळगण्याचे कोणतेही कारण नाही. प्राथमिक शिक्षणाचा पाया भक्कम असेल तरच विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्ज्वल घडते. शासनाच्या अपुऱ्या सुविधांमध्येही प्राथमिक शिक्षक विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी सातत्याने झटत आहेत. पालकांनी आणि समाजाने प्राथमिक शाळा व शिक्षकांविषयी आदर आणि आपुलकी जपली पाहिजे."

त्यांनी जीवन प्रबोधिनी ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष सत्यवान अ.नर आणि संयोजक सूर्यकांत पालव यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले. "अनेकांना श्रीमंत मित्र असतात; मात्र त्यांना समाजकार्यासाठी जोडून गावाच्या विकासासाठी त्यांचे दातृत्व मिळवून देण्याची क्षमता सूर्यकांत पालव यांच्यामध्ये आहे. गेल्या वर्षी ब्लँकेट वाटप आणि यावर्षी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे," असे ते म्हणाले.

भोगनाथ प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक टोनी म्हापसेकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, "देणे हा दैवी गुण आहे. समाजातील गरजू आणि वंचित घटकांना मदतीचा हात देणारी माणसे आज कमी होत चालली आहेत. जीवन प्रबोधिनी ट्रस्टने आरोग्य, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने केलेले कार्य प्रेरणादायी आहे. ज्ञानमंदिरातील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असून या बालकांच्या शुभेच्छा लाखमोलाच्या आहेत."

शिक्षिका राधिका कवडे यांनी ट्रस्टचे आभार मानताना सांगितले की, "मागील वर्षी विद्यार्थ्यांना ब्लँकेटचे वाटप करून मायेची ऊब दिली आणि यावर्षी शालेय साहित्याचे वितरण करून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बळ दिले. शाळेविषयी असलेली आपुलकी आणि दातृत्वाची भावना जपणाऱ्या ट्रस्टचे आम्ही सदैव ऋणी राहू."

कार्यक्रमास जीवन प्रबोधिनी ट्रस्टचे अध्यक्ष गणेश पार्टे , सरचिटणीस प्रशांत पवार, खजिनदार नागेश तांदळेकर, संयोजक सूर्यकांत पालव,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लक्ष्मण घाडीगावकर, उपाध्यक्ष समीर चव्हाण, ग्रामपंचायत सदस्या दीक्षा तांबे, शिक्षिका योगिता माळी, संगीता सावंत, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा प्रीती पारधीये, जॉन फर्नांडिस, रुजाय फर्नांडिस, बुधाजी घाडीगावकर, वैष्णवी सावंत, अलका दळवी, बाबू कळसुळकर, विद्यार्थी, पालक, शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |