दलितांच्या लेकीबद्दल सरकार किती उदासीन आहे - दिपक केदार

👤 अतुल सोनकांबळे | 📅 09 July 2026 | 👁 152 Views
दलितांच्या लेकीबद्दल सरकार किती उदासीन आहे - दिपक केदार
माळशिरस मातंग समाजाच्या उषाताई साठे या मजूर महिलेला गोळी झाडून संपवले आहे. आरोपीने जातीचा माज केला आणि एका गरीब अनुसूचित जातीच्या महिलेला क्रूरपणे संपवले आहे. राज्याला हादरून टाकणारी ही घटना आहे.दलितांच्या लेकीबद्दल सरकार किती उदासीन आहे. मिडियात दलितांच्या लेकीची बातमी नाही. मोठा शोध घेतल्यानंतर मला त्यांच माळखांबी गाव शोधण्यात यश आलं. कुटुंब भयभीत आहे. 10 वर्ष झालं हे कुटुंब त्या नराधम सचिन देशमुखकडे मजुरीचे काम करत होते. गावगुंड, सावकारी, जात आणि पैशाचा माज या बळावर एका दलित लेकीची हत्या केली. मी सरकारला मागणी करतो, दलित महिलेला न्याय देण्यासाठी नसरापुरच्या धर्तीवर 50 दिवसात आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, या उद्देशाने चांगला सरकारी वकील लावून तत्काळ न्याय दिला पाहिजे.
पीडित कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी व 50 लाखांची मदत करून 5 एकर जमीन देण्यात यावी. आरोपीची संपत्ती जप्त करावी, त्याने शस्त्र कुठून आणले, त्याच्या कटात आणखी कुणी सामील आहेत का याची एसआयटी मार्फत चौकशी करावी. पँथर दिपक भाऊ केदार यानी मागनी केली आहे
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना बिस्कीट व प्रसादाचे वाटप | "आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि चंद्रभागा नदीचे भाविकांनी घेतले मनोभावे दर्शन" | सिंधू बँक स्टाफ सोसायटी ची 40 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पत्रकार भवन, सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे उत्साहात संपन्न. | टाकेवाडीत आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा उत्साहात; विठ्ठल नामाच्या जयघोषाने परिसर दुमदुमला | गोंदवलेत शाळा व दवाखाना परिसर कचरामय; ग्रामस्थांचा संताप | तोरसोळे येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण गोठ्यात घुसून मध्यरात्री केला हल्ला; वन विभागाकडून तातडीने कारवाईची मागणी | मानपाडा-वाघाडी व सोनाळे खुबरोखपाडा अंधारात; १७ दिवसांपासून वीजपुरवठा खंडित, संतप्त ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा | हरिनामाच्या गजरात बाल दिंडीचा सोहळा रंगला मायणी प्राथमिक शाळा मुले व मुली सहभाग | मायणी पक्षी आश्रयास्थानाच्या दुरवस्थेप्रकरणी वनविभागाला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे निवेदन | ज्येष्ठ नागरिक संघ इंदापूरच्या मासिक बैठकीत ५१ सदस्यांची मोफत आरोग्य तपासणी; वाढदिवसानिमित्त गुणगौरव |