सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज संकटावर सरकार ॲक्शन मोडवर; सिंधुदुर्गासाठी विशेष मनुष्यबळ व साहित्य रवाना

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 09 July 2026 | 👁 163 Views
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज संकटावर सरकार ॲक्शन मोडवर; सिंधुदुर्गासाठी विशेष मनुष्यबळ व साहित्य रवाना
मुख्यमंत्री कार्यालयाने पालकमंत्री नितेश राणे यांच्या मागणीनुसार घेतली तातडीने बैठक सांगली, सातारा, बारामती या ठिकाणाहून कामगारांची विशेष पथके सिंधुदुर्गात रवाना मोडलेले पोल तातडीने उभे करून वीज पुरवठा केला जाणार सुरळीत पालकमंत्री नितेश राणे आणि मुख्यमंत्री कार्यालयाचे अप्पर मुख्य सचिव लोकेश चंद्रा यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स घेत दिल्या सूचना राज्याच्या मेजर स्टोअर मधून आवश्यक ते साहित्य पुरविण्याच्याही दिल्या सूचना मुख्यमंत्री कार्यालयाकडून तातडीच्या उपायोजनांमुळे सिंधुदुर्ग वासियांना दिलासा

मुख्यमंत्री कार्यालयाचे अप्पर मुख्य सचिव लोकेश चंद्रा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाऊस व वादळी वाऱ्यात पडझड होऊन वीजपुरवठा खंडित होण्याच्या कारणांचा आढावा घेतला. मोडलेले पोल पुन्हा उभे करण्यासाठी सातारा, बारामती, सांगली अशा ठिकाणाहून कामगारांची विशेष पथके सिंधुदुर्गात पाठविली जाणार आहेत. युद्ध पातळीवर पोल उभे करून ज्या गावांमध्ये वीज पुरवठा खंडित झालेला आहे त्या गावांना वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या. तर राज्याच्या मेजर स्टोअर मधून सिंधुदुर्गाला लागणारे ट्रांसफार्मर व इतर साहित्य पाठवून देण्याच्या सूचनाही यावेळी मुख्यमंत्री कार्यालयाचे,वीज वितरण विभागाचे अप्पर मुख्य सचिव लोकेश चंद्रा यांनी दिल्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही गावांमध्ये विजेचा पुरवठा खंडित झाल्याची दखल मुख्यमंत्री कार्यालयाकडून घेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला दिलासा देण्याचे काम केलेले आहे. यंत्रणा सज्ज करून वीजपुरवठा तातडीने सुरळीत करण्यासंदर्भात उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
मुख्यमंत्री कार्यालयाने आज पालकमंत्री नितेश राणे यांच्या समवेत व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली, या बैठकीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे,मुख्य अभियंता, कोकण मंडळ अनिल डोये,सिंधुदुर्ग जिल्हा अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख आदी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पाऊस व वादळी वाऱ्यामुळे वीज यंत्रणेचे मोठे नुकसान झाले आहे. सुमारे 600 वीज खांब व ट्रान्सफॉर्मरचे नुकसान झाले असून, विशेषतः सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यांना त्याचा सर्वाधिक फटका बसला आहे. दोडामार्ग तालुक्यातील 62 गावे बाधित झाली असून काही भाग गेल्या 8 दिवसांपासून अंधारात आहेत. याबाबत नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत.यावर बैठकीत चर्चा करण्यात आली.

यंत्रणेला आवश्यक असलेले सर्व साहित्य तातडीने उपलब्ध करून द्यावे, मनुष्यबळ वाढवावे आणि युद्धपातळीवर नियोजन करून वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे निर्देश देण्यात आले. भविष्यात अशा परिस्थितीत नागरिकांना कमीत कमी त्रास होईल, यासाठी प्रभावी नियोजन करावे. वारंवार ज्या ठिकाणी घटना घडतात त्या ठिकाणांची विशेष पाहणी करून प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. तसेच धोकादायक ठिकाणांची ओळख पटवून नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचनाही अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा यांनी दिल्या.
सिंधुदुर्ग जिल्हा हा दुर्गम जिल्हा असून येथे दरवर्षी अतिवृष्टीचा मोठा परिणाम होते. त्यामुळे केवळ पावसाळा सुरू झाल्यानंतर नव्हे, तर जानेवारी महिन्यापासूनच आवश्यक नियोजन आणि पूर्वतयारी सुरू करावी, असे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले.
अल निनोच्या प्रभावामुळे हवामानातील बदल लक्षात घेऊन आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी यंत्रणेची टीम पूर्णपणे सज्ज ठेवावी. आवश्यक मनुष्यबळ, साहित्य आणि उपकरणांची उपलब्धता वेळेत सुनिश्चित करून कोणत्याही संकटाला तत्काळ प्रतिसाद देता येईल, अशा पद्धतीने नियोजन करण्याच्या सूचनाही या बैठकीत पालकमंत्री नितेश राणे आणि अप्पर मुख्य सचिव चंद्रा यांनी दिल्या. .
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |