घोणसई गावाला पाण्याचा वेढा; मुख्य पूल पाण्याखाली

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 09 July 2026 | 👁 154 Views
घोणसई गावाला पाण्याचा वेढा; मुख्य पूल पाण्याखाली
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील घोणसई गावातील मुख्य रस्त्यावरील पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला असून गावाचा बाहेरील संपर्क तुटला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.

सततच्या पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला असून घोणसई गावातील मुख्य ओहोळावरील पूल जलमय झाला आहे. यामुळे कामानिमित्त गावाबाहेर गेलेले अनेक नागरिक गावात परतू शकत नसल्याने बाहेरच अडकून पडले आहेत. तसेच गावातील नागरिकांनाही अत्यावश्यक कामासाठी किंवा आपत्कालीन परिस्थितीत गावाबाहेर जाता येत नसल्याने गंभीर अडचणी निर्माण झाल्या आहेत.

या मार्गाला पर्यायी रस्ता उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांची गैरसोय अधिकच वाढली आहे. अवघ्या काही दिवसांच्या पावसात निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून प्रशासनाने तातडीने पाहणी करून सुरक्षित पर्यायी व्यवस्था करावी, तसेच कायमस्वरूपी उपाययोजना करून ग्रामस्थांना दिलासा द्यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |