माजी उपसरपंच लक्ष्मण कोकरे यांच्याकडून मेंढपाळ बांधवांना थेट पालावर जाऊन 'रेनकोट' वाटप

👤 आकाश दडस सातारा | 📅 06 July 2026 | 👁 75 Views
माजी उपसरपंच लक्ष्मण कोकरे यांच्याकडून मेंढपाळ बांधवांना थेट पालावर जाऊन 'रेनकोट' वाटप
...अन् मेंढपाळांचे डोळे पाणावले! "आजवर आमच्याकडे मतदान मागण्यासाठी खूप गाड्या आल्या, इलेक्शन जाहीर झाल्यानंतर आमच्या मताचा वापर करण्यासाठी अनेक जण येतात. परंतु, आमच्या कष्टाची जाणीव ठेवून आमच्या मदतीसाठी धावणारा कोणी 'बाप माणूस' आहे, असा खऱ्या अर्थाने आज भास झाला," अशी अत्यंत भावूक प्रतिक्रिया यावेळी उपस्थित मेंढपाळ बांधवांनी दिली.



ऊन, वारा, पाऊस अशा निसर्गाच्या कोणत्याही संकटाची तमा न बाळगता अहोरात्र कष्ट करणाऱ्या मेंढपाळ बांधवांचे पावसापासून रक्षण व्हावे, या उदात्त सामाजिक भावनेतून पुकळेवाडी येथे एक अत्यंत स्तुत्य आणि कौतुकास्पद उपक्रम राबवण्यात आला. यशवंत सेना महाराष्ट्र राज्याचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी उपसरपंच श्री. लक्ष्मण कोकरे यांच्या संकल्पनेतून पुकळेवाडीतील मेंढपाळ बांधवांना थेट त्यांच्या पालावर जाऊन मोफत रेनकोटचे वाटप करण्यात आले.

या संवेदनशील आणि कौतुकास्पद उपक्रमाप्रसंगी यशवंत सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष लक्ष्मण कोकरे, सचिन पुकळे, जगन्नाथ पुकळे, नितीन पुकळे, करण राजगुरु, अविनाश खाडे, राघु पुकळे, धनाजी पुकळे, आनंदा पुकळे यांच्यासह परिसरातील मेंढपाळ बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोकरे यांच्या या दातृत्वाचे आणि संवेदनशीलतेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.


पावसाळ्याच्या दिवसांत भटकंती करणाऱ्या मेंढपाळांना आणि त्यांच्या कुटुंबाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. हीच गरज ओळखून ४ आणि ५ जुलै रोजी या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे मेंढपाळ बांधवांना कुठेही जाण्याची गरज पडू नये, म्हणून कार्यकर्त्यांनी स्वतः प्रत्यक्ष पालावर जाऊन हे वाटप केले. आजवर मेंढपाळांच्या कष्टाचा सन्मान फारसा कोणी केला नाही, परंतु त्यांच्या या अथांग कष्टाची जाणीव ठेवून त्यांच्या सुखाचा हिस्सा बनणे, हाच या उपक्रमामागील शुद्ध हेतू असल्याचे संयोजकांनी सांगितले.


श्री. लक्ष्मण कोकरे हे पेशाने इंजिनिअर असून त्यांचे आई-वडील स्वतः मेंढपाळ व्यवसाय करत होते. त्यामुळे या व्यवसायातील संघर्ष, कष्ट आणि उघड्यावरील जगणे त्यांनी अगदी जवळून अनुभवले आहे. कितीही मोठ्या पदावर किंवा शहरात गेले, तरी आपल्या माणसांशी आणि मातीशी नाळ जोडून ठेवणे हीच खरी माणुसकी आहे, हे त्यांनी आपल्या कृतीतून पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. यापूर्वीही त्यांनी मेंढपाळांना मोफत औषध वाटप, दिवाळीनिमित्त विशेष मदत आणि मेंढपाळांचा सन्मान करण्याचे अनेक उपक्रम यशस्वीपणे राबवले आहेत.






Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
ठेकेदारांना अभय, नागरिकांना त्रास' | पीक विम्यात देवगडच्या शेतकऱ्यांवर अन्याय; कृषी अधिकाऱ्यांना सभागृहात धारेवर | वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा तब्बल आठ तासाने मिळाला मृतदेह..... | पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने करुळ येथील शेतकरी बेपत्ता | ओटभरणी समारंभात रुजवले संस्कारांचे बीज! | अनुसयामाता विश्रांतीधाम आश्रमात गुरुपौर्णिमा उत्सव | नगराध्यक्ष यु. टी. जाधव यांनी पारावर ज्येष्ठ नागरिकांची घेतली भेट; विकासकामांवर साधला संवाद | 'माणुसकीचा रेनकोट' : विश्वनायक फाउंडेशनकडून सिग्नलवरील गरजू बालक, महिला व वृद्धांना पावसाळी रेनकोटचे मोफत वाटप | सांगलीत 500+ पदांसाठी भव्य रोजगार मेळावा! 30 जुलैला 19 कंपन्यांची भरती | पत्रकार अक्षय यादव यांना ‘महाराष्ट्र जनगौरव पुरस्कार–२०२५’ने गौरविण्यात आले |