विधानपरिषदेत विविध आमदारांनी विचारलेल्या प्रश्नांवर ना. पंकजाताई मुंडे यांची अभ्यासपूर्ण उत्तरे

👤 संकेत सानप मुंबई मंत्रालय. | 📅 01 July 2026 | 👁 140 Views
विधानपरिषदेत विविध आमदारांनी विचारलेल्या प्रश्नांवर ना. पंकजाताई मुंडे यांची अभ्यासपूर्ण उत्तरे
विधानपरिषदेत विविध आमदारांनी विचारलेल्या प्रश्नांवर ना. पंकजाताई मुंडे यांची अभ्यासपूर्ण उत्तरे

पुण्यातील रेडीमिक्स काँक्रीट प्रकल्पांवर प्रदूषण नियंत्रणासाठी कठोर अंमलबजावणी

प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून नवीन मार्गदर्शक तत्वे जारी
विधानभवन
पुणे शहरातील रेडीमिक्स काँक्रीट (RMC) प्रकल्पांमधून मुठा नदीचे प्रदूषण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका येथे बैठक घेऊन नदी पुनर्जीवन प्रकल्प, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (STP) तसेच आरएमसी प्रकल्पांच्या प्रदूषण नियंत्रण उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या प्रकल्पांवर सातत्याने कारवाई केली जात असून, यापुढेही नियमित बैठका घेऊन परिस्थितीवर लक्ष ठेवले जाईल, असे पर्यावरण मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांनी सभागृहात सांगितले.

विधानपरिषद सदस्य परिणय फुके यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावरील चर्चेत डॉ. नीलम गोऱ्हे, प्रवीण दरेकर आणि विक्रम काळे यांनी सहभाग घेतला, त्यावर उत्तर देताना त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, पुण्यातील १०५ आरएमसी प्रकल्पांपैकी सर्व प्रकल्प बंद करण्यात आलेले नसून, केवळ नियमांचे पालन न करणारे, बेकायदेशीरपणे कार्यरत किंवा प्रदूषण नियंत्रणाच्या अटींचे उल्लंघन करणाऱ्या प्रकल्पांवरच कारवाई करण्यात आली आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) ने आरएमसी प्रकल्पांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यानुसार सर्व प्रकल्पांना बंदिस्त (बॉक्स कव्हर) व्यवस्था, धूळ नियंत्रणासाठी स्प्रिंकलर, वाहनांच्या टायर धुण्याची व्यवस्था आणि इतर प्रदूषण नियंत्रण उपाययोजना बंधनकारक करण्यात आल्या आहेत. या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न करणाऱ्या प्रकल्पांवर कठोर कारवाई केली जाईल.

मुठा नदीच्या प्रदूषणासाठी केवळ आरएमसी प्रकल्पच जबाबदार नसून स्थानिक स्वराज्य संस्थांकडून होणारे सांडपाणी हेही मोठे कारण असल्याचे नमूद करत त्यांनी सांगितले की, नदी प्रदूषण कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर एसटीपी उभारण्याचे काम सुरू आहे. पाण्याच्या गुणवत्तेचे ऑनलाईन निरीक्षणही करण्यात येत आहे, असेही मंत्री श्रीमती मुंडे यांनी नमूद केले.

पर्यावरण विभागाकडून प्रदूषण करणाऱ्या उद्योगांना वेळोवेळी नोटिसा दिल्या जात असून, नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच प्रदूषण नियंत्रण अधिक प्रभावी करण्यासाठी उद्योगांच्या बँक गॅरंटीची रक्कम वाढविण्याबाबत समितीमार्फत धोरण तयार करण्यात येत असून, अल्पकालीन, मध्यमकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजनांचा समावेश असलेले व्यापक धोरणही तयार करण्यात येत असल्याचे मंत्री श्रीमती मुंडे यांनी सांगितले.

*कानगाव–पाटस सिमेंट प्रकल्पांमुळे वाढलेल्या प्रदूषणावर कारवाई*
------
कानगाव–पाटस या भागातील सिमेंट प्लांट असलेल्या कंपन्यांची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून वेळोवेळी तपासणी केली आहे. आतापर्यंत किमान सात वेळा निरीक्षण करण्यात आले असून अनेक ठिकाणी गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत. नियमभंग करणाऱ्या कंपन्यांना नोटीसही देण्यात आली आहे, अशी माहिती पंकजाताई मुंडे यांनी विधानपरिषदेत दिली. सदस्य सदाभाऊ खोत यांनी यासंदर्भात प्रश्न मांडला होता.
Pankaja Gopinath Mundeविधानपरिषदेत विविध आमदारांनी विचारलेल्या प्रश्नांवर ना. पंकजाताई मुंडे यांची अभ्यासपूर्ण उत्तरे*
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |