सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी अतीश उर्फ भाई जेठे यांची निवड

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 30 June 2026 | 👁 322 Views
सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी अतीश उर्फ भाई जेठे यांची निवड

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीच्या नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे. या कार्यकारिणीमध्ये अतीश रावजी जेठे उर्फ भाई जेठे यांची जिल्हा उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या निवडीवर शिक्कामोर्तब केले आहे. जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर यांना पाठवलेल्या अधिकृत पत्राद्वारे ही नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी ही निवड महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
अतीश रावजी जेठे यांनी आपल्या सामाजिक आणि राजकीय कार्याद्वारे पक्षात भरीव योगदान दिले आहे. त्यांच्या या निवडीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेस पक्षात उत्साहाचे वातावरण असून, पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
आगामी काळात त्यांच्या अनुभवाचा फायदा पक्ष विस्तारासाठी निश्चितच होईल, अशी भावना स्थानिक पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना बिस्कीट व प्रसादाचे वाटप | "आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि चंद्रभागा नदीचे भाविकांनी घेतले मनोभावे दर्शन" | सिंधू बँक स्टाफ सोसायटी ची 40 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पत्रकार भवन, सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे उत्साहात संपन्न. | टाकेवाडीत आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा उत्साहात; विठ्ठल नामाच्या जयघोषाने परिसर दुमदुमला | गोंदवलेत शाळा व दवाखाना परिसर कचरामय; ग्रामस्थांचा संताप | तोरसोळे येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण गोठ्यात घुसून मध्यरात्री केला हल्ला; वन विभागाकडून तातडीने कारवाईची मागणी | मानपाडा-वाघाडी व सोनाळे खुबरोखपाडा अंधारात; १७ दिवसांपासून वीजपुरवठा खंडित, संतप्त ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा | हरिनामाच्या गजरात बाल दिंडीचा सोहळा रंगला मायणी प्राथमिक शाळा मुले व मुली सहभाग | मायणी पक्षी आश्रयास्थानाच्या दुरवस्थेप्रकरणी वनविभागाला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे निवेदन | ज्येष्ठ नागरिक संघ इंदापूरच्या मासिक बैठकीत ५१ सदस्यांची मोफत आरोग्य तपासणी; वाढदिवसानिमित्त गुणगौरव |