ईश्वरपूरच्या यल्लमा चौकाचा श्वास गुदमरतोय

👤 राहुल टिबे ईश्वरपूर,सांगली | 📅 28 June 2026 | 👁 1048 Views
ईश्वरपूरच्या यल्लमा चौकाचा श्वास गुदमरतोय
ईश्वरपूर, दि. 28 जून 2026 शहराचा मुख्य चौक असलेला यल्लमा चौक मंदिर परिसर सध्या बेशिस्त पार्किंगचा अड्डा बनला आहे. भाजी मार्केटचे नूतनीकरण सुरू असल्याने रविवारचा बाजार रस्त्यावर भरत असून, प्रशासनाने वाहतूक व पार्किंग व्यवस्थेकडे दुर्लक्ष केल्याने परिसरातील नागरिक व दुकानदार प्रचंड त्रस्त झाले आहेत.आज रविवार बाजारचा दिवस असल्याने यल्लमा चौक ते कचेरी रोडवर मोठ्या प्रमाणात बाजार भरला होता. ईश्वरपूर शहर, उपनगर व आजूबाजूच्या खेड्यांमधून व्यापारी, शेतकरी,तसेच नागरिक खरेदी विक्री साठी येतात. मात्र पार्किंगची कोणतीही व्यवस्था नसल्याने लोक कुठेही, कशाही गाड्या लावत आहेत. दुकानांसमोर गाड्या लागल्याने ग्राहकांना आत यायला अडचण होत आहे त्यामुळे वाहनधारक व दुकानदारांमध्ये बरेचदा वाद होत आहे यल्लमा देवीचा भक्त परिवार खूप मोठा आहे मुख्य चौकात असणाऱ्या या मंदिरासमोरच गाड्या पार्क केल्याने दर्शनास येणाऱ्या भाविकांना त्रास होत आहे.तसेच गांधी चौक आणि मार्केट यार्ड कडून येणाऱ्या वाहनांना रस्ताच मिळत नाही त्यामुळे भाजी मार्केटचे काम पूर्ण होईपर्यंत प्रशासनाने बाजारासाठी येणाऱ्या लोकांना तात्पुरती पर्यायी पार्किंग व्यवस्था उपलब्ध करून द्यावी. वाहतुकीला व पार्किंगला शिस्त लावून लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी मागणी जोर धरत आहे.

---
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना बिस्कीट व प्रसादाचे वाटप | "आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि चंद्रभागा नदीचे भाविकांनी घेतले मनोभावे दर्शन" | सिंधू बँक स्टाफ सोसायटी ची 40 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पत्रकार भवन, सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे उत्साहात संपन्न. | टाकेवाडीत आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा उत्साहात; विठ्ठल नामाच्या जयघोषाने परिसर दुमदुमला | गोंदवलेत शाळा व दवाखाना परिसर कचरामय; ग्रामस्थांचा संताप | तोरसोळे येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण गोठ्यात घुसून मध्यरात्री केला हल्ला; वन विभागाकडून तातडीने कारवाईची मागणी | मानपाडा-वाघाडी व सोनाळे खुबरोखपाडा अंधारात; १७ दिवसांपासून वीजपुरवठा खंडित, संतप्त ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा | हरिनामाच्या गजरात बाल दिंडीचा सोहळा रंगला मायणी प्राथमिक शाळा मुले व मुली सहभाग | मायणी पक्षी आश्रयास्थानाच्या दुरवस्थेप्रकरणी वनविभागाला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे निवेदन | ज्येष्ठ नागरिक संघ इंदापूरच्या मासिक बैठकीत ५१ सदस्यांची मोफत आरोग्य तपासणी; वाढदिवसानिमित्त गुणगौरव |