ग. दि. माडगूळकर आयटीआयमध्ये शिवराज्याभिषेक दिन उत्साहात; ७० विद्यार्थ्यांचा गौरव

👤 आटपाडी प्रतिनिधी | 📅 28 June 2026 | 👁 177 Views
ग. दि. माडगूळकर आयटीआयमध्ये शिवराज्याभिषेक दिन उत्साहात; ७० विद्यार्थ्यांचा गौरव
आटपाडी, प्रतिनिधी : ग. दि. माडगूळकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आटपाडी येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करण्यात आले.

यावेळी आटपाडी नगरपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांचा तसेच विविध नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीसाठी निवड झालेल्या संस्थेतील ७० विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करत उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत संचालक तथा शिक्षक आबासाहेब देवकुळे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याचा प्रेरणादायी आढावा घेत विद्यार्थ्यांना संस्कार, गुणवत्तापूर्ण शिक्षण, उत्तम आरोग्य, व्यसनमुक्त जीवन, कुटुंबाचे महत्त्व आणि मोबाईलच्या गैरवापरापासून दूर राहण्याचा संदेश दिला.

नगराध्यक्ष उत्तम (यु. टी.) जाधव यांनी नगरपंचायतीच्या वतीने संस्थेस पिण्याच्या पाण्याची सुविधा, वृक्षारोपण तसेच परिसर स्वच्छतेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, अशी ग्वाही दिली. यावेळी नगरसेवक ऋषिकेश देशमुख, व्यवस्थापन समिती सदस्य सतीश भिंगे, नगराध्यक्ष उत्तम जाधव आणि प्रमुख वक्ते आबासाहेब देवकुळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डी. व्ही. ओबासे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा सत्कार व्यवस्थापन समिती सदस्य सतीश भिंगे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सणगर यांनी केले, तर प्रशिक्षणाधिकारी एस. के. शिसाळ यांनी आभार प्रदर्शन केले.

या कार्यक्रमास उपनगराध्यक्षा मीनाक्षी पाटील, नगरपंचायतीचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक, संस्थेचे अधिकारी, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रेरणादायी वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आदर्श घेऊन राष्ट्रनिर्मितीत सक्रिय योगदान देण्याचा संकल्प व्यक्त केला.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |